सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आंदोलनात उतरणार शिक्षक ; शुक्रवारी शाळाबंद आंदोलन

नंदुरबार : शिक्षण विभागाच्या चतुर्थश्रेणी कर्मचारी भरतीबाबत शासनाने घेतलेल्या अन्यायकारक धोरणाविरोधात

Nandurbar MH
  • Dec 19 2020 11:54AM

 सुदर्शन न्यूज केतन रघुवंशी नंदुरबार 

नंदुरबार : शिक्षण विभागाच्या चतुर्थश्रेणी कर्मचारी भरतीबाबत शासनाने घेतलेल्या अन्यायकारक धोरणाविरोधात शुक्रवारी (ता. १८) एकदिवसीय शाळाबंद आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा शिक्षण संस्था संघाचे जिल्हाध्यक्ष श्रीपतभाई पाटील, सचिव एन. डी. नांद्रे यांनी दिली आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड व माध्यमिक शिक्षणाधिकारी एम. व्ही. कदम यांना निवेदन दिले आहे.
राज्य शासनाने शिक्षण विभागासाठी ११ डिसेंबरला एक अध्यादेश निर्गमित केला असून, यापुढे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर अनुदानित, विना अनुदानित, अशंतः अनुदानित शाळांवरील शिपाईपद संपुष्टात येणार असून, सेवानिवृत्तीनंतर शिपाई, नाईक, पहारेकरी, रात्रीचा पहारेकरी, सफाईदार, कामाठी, तेलवाला, हमाल परिचर, चौकीदार, प्रयोगशाळा परिचर ही जुनी पदे रिक्त झाल्यानंतर सरळसेवेने भरती करता येणार नाहीत.या उलट कंत्राटी पदे भरले जाणार असून, त्यांच्या नियुक्त्या अल्प मानधनावर केल्या जाणार आहेत. हे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अन्यायकारक धोरण असून, ते पदे संपुष्टात आल्यानंतर बेरोजगारी वाढणार आहे व शाळा चालविणे कठीण होईल.

आंदोलन होणार
शिक्षणाचे काम करताना संस्थाचालकांसमोर समस्या निर्माण होणार आहेत. ११ डिसेंबरचा अध्यादेश शासनाने तत्काळ मागे घ्यावा, यासाठी संस्थाचालक, शिक्षकेतर कर्मचारी व मुख्याध्यापकांनी एकत्र येऊन विरोध करावा व त्यासाठी शुक्रवारी राज्य शिक्षण संस्था महामंडळातर्फे शाळाबंद आंदोलन होणार आहे. निवेदन देतेवेळी नंदुरबार जिल्हा शिक्षण संस्था संघाचे सचिव एन. डी. नांद्रे, नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील, नंदुरबार जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर नांद्रे, प्रा. दत्तात्रय शिंदे उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार