सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

स्वराज्यजननी माॅं जिजाऊ

सह्याद्रीच्या कणाकणात अस्मिता रुजावी, प्रत्येक मराठी माणसाने जिची पाऊले वंदावी, जिच्या विलक्षण छात्रतेजाने वीरता अंगी संचारावी आणि प्रत्येक मराठी माणसाने प्रेरित व्हावे असे प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे माॅं जिजाऊ.

राजश्री शेषरावजी खाजोने
  • Jan 12 2021 12:09AM
जिजाबाईंचा जन्म १२ जानेवारी इ.स.१५९८ मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे झाला. जिजाबाईंच्या वडीलांचे नाव लखुजी जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई होते. डिसेंबर इ.स.१६०५ मध्ये जिजाबाईंचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी दौलताबाद येथे झाला. तेथून स्वराज्याच्या एका ऐतिहासिक पर्वाला सुरुवात झाली. जिजामाता आणि शहाजीराजे यांच्या पोटी शिवबा जन्माला आले. देशालाच नव्हे तर जगाला ज्याचा अभिमान वाटावा, कुळाला लौकिक मिळावा असा थोर पुत्र शिवबा घडला तो माॅं जिजाऊच्याच अथक प्रयत्नांनी. सूर्याप्रमाणे तेजस्वी व अलौकिक बुद्धिमत्ता, शत्रूवर विजय मिळवण्यासाठीचा मुत्सद्दीपणा, नीतिमत्ता या आपल्या जीवनशैलीने महाराष्ट्राच्या पारतंत्र्याचा काळोख मिटवून स्वातंत्र्याची पहाट दाखवण्यासाठी प्रखर सूर्याप्रमाणे त्या आयुष्यभर झटल्या. आपल्या धाडसाने, शौर्याने एक स्त्री शक्ती बनुन काय कार्य करू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण माॅं जिजाऊ ने आपल्या कार्यातून जगासमोर मांडले. अगाध तुझी थोरवी, शब्दांतीत न सामवावी, तू घडविलास इतिहास, तुझी पाऊले वंदावी. हिंदवी स्वराज्याचा भगवा आसमंतात फडकवण्याचे प्रण घेऊन हिंदवी स्वराज्याची पहाट मराठी माणसाला दाखवण्यासाठी स्वातंत्र्यरुपी स्वराज्याचा वटवृक्ष उभा करण्यासाठी प्रेरक शक्ती म्हणून माॅं जिजाऊ उभ्या राहिल्या. म्हणूनच त्या स्वातंत्र्यजननी ठरल्या. आईचे अमूल्य संस्कार मुलाच्या जीवनाचा ओंकार घडवितो असे म्हणतात. त्याचे खरेखुरे प्रत्यंतर माॅं जिजाऊंनी शिवबांवर केलेल्या संस्काराच्या रूपाने आपल्याला दिसते. धाडस, निर्णयक्षमता, दूरदृष्टी, ध्येयाशक्ती व ध्येयासाठी जगण्याची प्रवृत्ती त्याचप्रमाणे माणसे ओळखण्याची कला हे शिवबाच्या चारित्राचे पैलू घडले ते म्हणजे जिजाऊ मातेच्या संस्कारातूनच. म्हणूनच नात्यांना, भावनांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपूर उतरला होता. आजूबाजूने परकीय सत्तेचा धुमाकूळ असतांना व शहाजीराजे मोहिमेवर असताना त्यांनी राज्य चालवले. वीरपत्नी म्हणून त्यांनी राज्यकारभार सांभाळला, सोबतच शिवबाचा सांभाळ करताना वडिलांच्या अनुपस्थितीत दोघांचीही भूमिका पार पाडली. एक उत्तम राज्यकर्ती, कुशल प्रशासक, उत्तम गुरू, धाडसी स्त्री, निर्णयक्षमता व दूरदृष्टी असणाऱ्या व्यक्ती, एक थोर माऊली असे कितीतरी पैलू त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आपल्याला दिसून येतात. त्यांनी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर न डगमगता आपली भूमिका ठामपणे पार पाडून एक वेगळा ठसा उमटवला. स्वराज्याची विण घालतांना त्यांनी माणसे जोडली. शिवबांच्या सोबतच सर्व मावळप्रांतांच्या त्या सावली ठरल्या. आत्मविश्वासाची बीजे त्यांनी शिवबांच्या ठायी रुजवली. मराठी स्वराज्याचे एक स्वप्न पाहिले व त्या स्वप्नाची बीजे शिवबाच्या मनी रुजवून त्या स्वप्नपूर्तीतुनच घडला तो स्वराज्याचा इतिहास. परकियांच्या गुलामगिरीत अनेक वर्ष पिचलेला महाराष्ट्र या माऊलीच्या मार्गदर्शन आणि प्रेरणेने व धाडसाने स्वतंत्र झाला. स्वातंत्र्याची पहाट छत्रपती शिवाजीच्या रूपाने उगवली त्यामागे होते जिजाऊंचे प्रयत्न आणि जिजाऊंची साधना. एक स्त्री काय करू शकते याचे प्रत्यक्ष उदाहरण त्यांनी शिवाजींच्या हस्ते स्वराज्य स्थापून घालून दिले. शिवबाला छत्रपती शिवाजी महाराज बनवण्याचे खरे श्रेय जिजाऊंचेच आहे. ऐसा घडला शिवबा, धन्य ती माऊली झाली, साऱ्या मराठी माणसाची, जणू ती सावली झाली. हिंदवी स्वराज्य माॅं जिजाऊंच्या प्रेरणेने स्थापन झाले. त्यांनी लावलेल्या बीजाचा वटवृक्ष झाला. ६ जून१६७६ रोजी स्वराज्याचे पहिले छत्रपती म्हणून शिवरायांचा राज्याभिषेक झाला. हा अभूतपूर्व सोहळा झाल्यानंतर बारा दिवसांनी १७ जुन १६७६ रोजी माॅं जिजाऊ यांचे निधन झाले. शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य पाहून समाधानाने त्यांनी त्यांचे नेत्र मिटले. स्वराज्य निर्मिती ही एकच आस आयुष्यभर त्यांनी जपली आणि ती पूर्णत्वास नेली. म्हणूनच स्वराजजननी हा लौकिक त्यांना सार्थ ठरतो. अशा थोर राजमाता, स्वराजजननी, अलौकिक स्त्रीला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! तुझे छात्रतेज, प्रत्येक स्त्रिच्या ठायी रुजुदे, संस्काराने तुझ्या, घरोघरी शिवबा घडू दे.  

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार