सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आजोबाने आपल्या नातीला गर्भवती करून नात्यांलाच फासली काळीमा

एका चुलत आजोबाने आपल्या 15 वर्ष 5 महिने आणि 5 दिवस वय असलेल्या

Sudarshan MH
  • Oct 23 2020 1:16PM
नांदेड दि.23(अरविंद जाधव)  एका चुलत आजोबाने आपल्या 15 वर्ष 5 महिने आणि 5 दिवस वय असलेल्या अत्यंत निरागस बालिकेवर अत्याचार करून तिला गर्भवती केले. सध्या या महान आजोबाची पोलीस कोठडी सुरू आहे. न्यायालयाने त्याला 7 दिवसांसाठी पोलीस कोठडीत पाठविले आहे.

लोहा तालुक्यातील एका गावातील माधव नामदेव मोरे (40) यांनी नात्यातील आपली चुलत नात असलेल्या बालिकेला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात आणले. तिला असलेल्या त्रासाची तपासणी करतांना वैद्यकीय मंडळींना हे लक्षात आले की, ही बालिका गर्भवती आहे. भारतात पुरूष प्रधान संस्कृती आहे. त्यामुळे घरचा मामला आहे. म्हणून अगोदर गप्प बसण्याचे ठरले. पण वैद्यकीय मंडळींनी या घटनेची माहिती पोलीसांना दिली. सोनखेड पोलीसांनी त्वरीत प्रभावाने महिला दक्षता समितीच्या सदस्यांसमोर या बालिकेचा जबाब घेतला आणि सोनखेडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव मांजरमकर यांनी तक्रार दिली.

या तक्रारीवरून अत्यंत महान व्यक्तीमत्व असलेल्या माधव नामेदव मोरे विरुध्द पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आणि माधव मोरेला अटक केली. या प्रकरणाचा तपास सोनखेडचे पोलीस उपनिरिक्षक चंदनसिंह परिहार यांच्याकडे आहे. पोलीसांनी माधव मोरेला मुखेड न्यायालयासमक्ष हजर केले. न्यायालयाने आपल्या नातीसोबत अत्याचार करणाऱ्या आजोबाला साथ दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार