सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बविआ'च्या प्रयत्नांनी गॅससाठीची अनामत रक्कम माफ - आ. क्षितीज ठाकूर यांच्या विनंतीनंतर कंपनीचा निर्णय

साडेपाच हजारांऐवजी आता फक्त ५०० रुपये आकारणार

Sudarshan MH
  • Oct 16 2020 2:35PM
वसई विरार - ( मनीष गुप्ता ) कोरोना काळात सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न करणाऱ्या बहुजन विकास आघाडीने आणखी एका विषयात आघाडी घेतली आहे. पालघर जिल्ह्यातील अनेक कुटुंबाना पाईपलाईन गॅस जोडणीसाठी भरावी लागणारी अनामत रक्कम कमी करता यावी, यासाठी आमदार क्षितीज ठाकूर यांच्यामार्फत प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना यश आले असून आता गुजरात गॅस लिमिटेड या कंपनीने अनामत रक्कम ९० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे आर्थिक कंबरडं मोडलं असताना पालघर जिल्ह्यातील नागरिकांना त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

याआधी पाईपलाईन गॅस पुरवठा करण्यासाठी गुजरात गॅस लिमिटेड ही कंपनी ५,६१८ रुपये एवढी रक्कम अनामत म्हणून घेत होती. सध्या कोरोनाकाळात अनेकांचे रोजगार गेले आहेत. अनेकांच्या पगारांमध्येही कपात करण्यात आली आहे. हातावर पोट असणाऱ्यांना तर टाळेबंदीमुळे प्रचंड संकटाचा सामना करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर पाईपलाईन गॅससाठी साडेपाच हजार रुपयांची अनामत रक्कम भरणेही अनेकांसाठी कठीण होते. 

ही गोष्ट लक्षात घेऊन आमदार क्षितीज ठाकूर यांनी २८ सप्टेंबर रोजी गुजरात गॅस लिमिटेडच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. ही रक्कम एक तर पूर्ण माफ करावी किंवा निदान नाममात्र रक्कम आकारण्यात यावी, अशी मागणी आमदार क्षितीज ठाकूर यांनी केली होती. या बैठकीचा संदर्भ देत कंपनीचे उपाध्यक्ष नवीन शर्मा यांनी आमदार क्षितीज ठाकूर यांना पत्र पाठवून कंपनीने ही रक्कम ९० टक्क्यांनी कमी करत असल्याचं नमूद केलं आहे.

'२८ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत आपण केलेल्या विनंतीला मान देत आम्ही एकूण रकमेच्या फक्त १० टक्के रक्कम अनामत म्हणून आकारण्याचा निर्णय घेतला आहे. आता ग्राहकांना साडेपाच हजारांऐवजी फक्त ५०० रुपये एवढीच अनामत रक्कम भरावी लागणार आहे,' असं गुजरात गॅस लिमिटेडचे उपाध्यक्ष नवीन शर्मा यांनी पत्रात म्हटलं आहे.

या निर्णयाबद्दल बहुजन विकास आघाडी, व्यक्तिश: मी आणि पालघरवासी कंपनीचे आभारी आहोत. सध्याची परिस्थिती पाहता, कंपनीने घेतलेला हा निर्णय खरोखरच स्तुत्य आहे. या निर्णयामुळे सामान्य माणसाला मोठा दिलासा मिळणार आहे, अशी भावना आमदार क्षितीज ठाकूर यांनी व्यक्त केली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार