सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोविडचा इतिहास लिहिला जाईल तेंव्हा पोलीसांची नोंद सुवर्ण अक्षराने व्हावी असे काम करा – निसार तांबोळी

कोविडचा इतिहास लिहिला

Sudarshan MH
  • Oct 11 2020 8:02AM
नांदेड दि.११(अरविंद जाधव)| भविष्यात कोविडचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी पोलीस विभागाने केलेल्या कामाची नोंद सुवर्ण अक्षरात व्हावी असे काम आपल्याला करायचे आहे असे उद्‌गार पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी धर्माबाद पोलीस ठाण्यात व्यक्त केले.

आज निसार तांबोळी आपल्या परिक्षेत्रातील धर्माबाद पोलीस ठाण्यात भेट देण्यास आले होते. तेंव्हा ते आपल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी बोलत होते. याप्रसंगी निसार तांबोळी पुढे म्हणाले की, कोविड कालखंडात शासनाच्या अनेक विभागांनी भरपूर काम केले आहे. त्यात पोलीस विभागाचा महत्वपूर्ण वाटा आहे. कारण इतर मंडळी एक दुसऱ्याला हात लावत नसतांना पोलीसांना तर ते अनेक प्रसंगी करावेच लागले. अशाही परिस्थितीत पोलीसांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे. तेंव्हा जोपर्यंत कोविड पुर्णपणे नियंत्रणात येत नाही. तोपर्यंत आम्हाला असे काम करायला हवे की, जेंव्हा केंव्हा कोविडचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी पोलीसांच्या कामाचा उल्लेख सुवर्ण अक्षरांनी व्हावा अशी माझी अपेक्षा आहे.

निसार तांबोळी यांनी पोलीस ठाणे धर्माबाद येथील स्वच्छता, पोलीस वसाहतीतील स्वच्छता पाहून समाधान व्यक्त केले. माझे कुटूंब माझी जबाबदारी या शासनाच्या कार्यक्रमाला उत्कृष्टपणे अंमलात आणण्यासाठी काय करायला हवे याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. निसार तांबोळी यांच्या भेटीने पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनात विश्र्वास निर्माण झाला. याप्रसंगी भोकरचे अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे, धर्माबादचे पोलीस उपअधिक्षक सुनिल पाटील, बिलोलीचे डॉ.सिध्देश्र्वर धुमाळ, पोलीस निरिक्षक सोहन माच्छरे, पोलीस उपनिरिक्षक गणेश कराड, पोलीस ठाणे धर्माबाद येथील सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार