सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भोकर येथे नुतन अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांनी कार्यभार स्विकारला

अपर पोलीस अधिक्षक भोकर

Sudarshan MH
  • Oct 10 2020 10:36AM
नांदेड दि.१०(अरविंद जाधव)अपर पोलीस अधिक्षक भोकर या पदाचा कार्यभार स्विकारतांना नुतन अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांनी मी सर्व सामान्य माणसासाठी कोणत्याही क्षणी हजर राहणार असल्याचे सांगितले. अपर पोलीस अधिक्षक विजय पवार यांनी भोकर कार्यालयाचा पदभार विजय कबाडे यांच्याकडे सोपवला.

नांदेड जिल्ह्यातील अपर पोलीस अधिक्षक कार्यालय भोकर येथे कार्यरत असलेले विजय पवार यांची बदली शासनाने केली आणि त्यांच्या जागी बीड येथील अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांची नियुक्ती केली. पण विजय पवार यांना शासनाने कोणतीही नवीन नियुक्ती दिली नाही. सध्या ते नांदेड अपर पोलीस अधिक्षकाचा पदभार सुध्दा सांभाळत आहेत. कारण नांदेड अपर पोलीस अधिक्षक दत्ताराम नांदेड यांची बदली अहमदनगर जिल्ह्यात अपर पोलीस अधिक्षक पदावर झाली आहे.
 दि.8 ऑक्टोबर रोजी वायुसेना दिवसाच्या महुर्तावर विजय कबाडे नांदेडला आले आणि त्यांनी नांदेड येथील आपल्या सर्व कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करून भोकरला पोहचले. भोकर येथे एका छोटेखाली कार्यक्रमात विजय पवार यांनी आपल्या पदाचा सर्व कार्यभार विजय कबाडे यांच्याकडे सोपवला. याप्रसंगी विजय पवार म्हणाले विजय जात आहे आणि विजय आला आहे. इंग्रजी भाषेत विजय या शब्दाचा अर्थ व्हिक्टरी असा होतो. त्यामुळे जनतेसाठी कोणताही फरक जाणवणार नाही. जनतेला आवश्यकता असेल तेंव्हा मी पण हजर राहत होतो आणि विजय कबाडे सुध्दा हजर राहतील. याप्रसंगी भोकर अपर पोलीस अधिक्षक कार्यालयाचे सर्व कर्मचारी भोकर पोलीस ठाण्याचे अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

विजय पवार यांनी सर्व सामान्य जनतेसोबत नेहमीच सलोख्याचे संबंध राहत काम केले. विजय कबाडे हे नांदेड शहर उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक होते. त्यामुळे त्यांना नांदेड जिल्ह्याची जवळपास सर्व माहिती आहे. अहमदपूर येथे कार्यरत असतांना त्यांनी भोकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालणाऱ्या एका मोठ्या जुगार अड्‌ड्याला विशेष पोलीस महानिरिक्षकांच्या आदेशावरून नेस्तनाबूत केले होते. त्यामुळे त्या कार्यवाहीची जाणिव आजही या भागातील 2 नंबरचे कामकाज करणाऱ्या लोकांमध्ये असेल असे लिहिले तर वावगे ठरणार नाही

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार