सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार शहरातलगतच्या शेतात बिबट्याचा संचार उमर्दे रोडवरील शेतात मादा बिबटाने दिला चार पिलांना जन्म

बिबटाने दिला चार पिलांना जन्म

Sudarshan MH
  • Oct 5 2020 10:30AM
नंदुरबार - शहरा लगतच्या शेतात वाघिणीने बस्तान मांडले असून तिथे चार पिलांना जन्म दिला असल्याचे रविवार रोजी आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. दूर जंगलात नव्हे तर नंदुरबार शहरातील बायपास ऊड्डाणपूलाखालील उमर्दे रस्त्यावर कृषी विद्यालया मागील शेतात बिबट्याच्या मादीने चार पिलांना जन्म दिला आहे.शेखर मराठे यांच्या मालकीच्या शेतात काम करणाऱ्या मजुराला झुडपांमध्ये  रविवार रोजी दुपारी ही पिले आढळली तेव्हा ही बाब उघड झाली.त्यांनी लगेचच शेखर मराठे यांना ही माहिती दिली.शेखर मराठे यांनी वन विभागाशी संपर्क करीत आरएफओ रघुवंशी यांना पाचारण केले. रघुवंशी यांनी रात्री शेतात भेट देऊन पिलांची सुरक्षितता ठेवण्याविषयीच्या सूचना दिल्या.ज्या अर्थी बिबट्याच्या मादीने या शेतात पिलांना जन्म दिला त्याअर्थी बिबट्या नर आणि मादीचा नंदुरबार शहर परिसरालगतच वावर असावा हे आता उघड झाले आहे. याच्या आधी काही महिन्यांपूर्वी नंदुरबारच्या पूर्व दिशेला शहरापासून दहा किमी अंतरावरील वावद शिवारात दोनदा बिबट्याने दर्शन दिले होते. नंतर ऊत्तरेला ठाणेपाडा परिसरात आढळला होता. अलीकडेच नंदुरबारपासून दक्षिणेला हातोडा पुलाच्या परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन झाले आणि आता थेट शहरातील उड्डाणपुलाजवळ पिले देण्याचीी घटना घडली आहे.नंदुरबार पासून 20 - 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या तळोदा शहरात तर वरच्यावर उघडपणे बिबट्याचा मुक्तसंचार दिसू लागला आहे.शहादा, तळोदा व नंदुरबार या तीन तालुक्यांना जोडणारा तापी परिसर बिबट्यांच्या मुक्त संचाराचा व रहिवासाचा भाग बनला असल्याचे यावरून निर्देशीत होत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार