सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आ. माधवराव पाटील जवळगावकर व जिल्हाधिकारी डॉ. ईटनकर नुकसानग्रस्त शेतकऱ्यां च्या थेट बांधावर

हदगाव दि.24(अरविंद जाधव) मागील काही दिवसापासून हदगाव

Sudarshan MH
  • Sep 24 2020 11:28AM
हदगाव दि.24(अरविंद जाधव) मागील काही दिवसापासून हदगाव/ हिमायतनगर परिसरात सतत अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे या अतिवृष्टीने खरीप हंगामातील उडीद, मूग, सोयाबीन, यासह, हळद, उस, या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

सोयाबीन उभ्या पिकांच्या झाडाच्या शेंगाना कोंब फुटले आहेत सर्वत्र शेतात पाणी झाल्यामुळे खरीप पिकांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. हदगाव तालुक्यातील पैनगंगा नदी, नाल्यांना आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी थेट शेतकऱ्या च्या बांधावर जाऊन करतांना नांदेड जिल्याचे, जिल्हाधिकारी मा. डॉ. विपीन इटणकर , हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर तहसीलदार जिवराज डापकर व आदी उपस्थित होते.

पंचनामे करुन लगेच मदत करण्याची मागणी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी हदगाव तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
हदगांव तालुक्यात अती पावसामुळे पुर येऊन शेत जमीनी खरडुन गेल्या आहेत. सोयाबिनला कोम फोटुन पुर्णत खराब झाले असुन स्थानिक प्रशासनाने लगेच पंचनामे करुन आर्थिक मदत देण्याची मागणी हदगाव तालुका युवक काँग्रेस च्या वतीने एका निवेदन द्वरे तहसिलदार यांच्याकडे केली. त्यांनी बुधवारी दिलेल्या निवेदन म्हटले की गेल्य 20 ते 25 दिवसा पासुन सतत च्या पाऊसामुळे शेतातील काढणीला आलेल सोयाबीनचपीक केवळपाऊसा मुळे पाण्यात गेले असुन त्या सोयाबीनला आता कोंब फुटले आहेत.
त्या मुळे सोयाबीन कापुस तिळ व ज्वारी पिकाचे प्रंचड प्रमाणात नुकसान झालेले आहे नुकसान ग्रस्त पीकाची पाहणी करुन शेतक-याना नुकसान भरपाई करण्याची शिफारस शासनाकडे करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे .या निवेदनावर गोपाळराव पवार, सिताराम पाटील फळीकर,नागोराव सुर्यवशी, दिलीप चव्हाण, दिलीप पवार, धनजय पवार (पाथरडकर), विनोद माने, मंगेश संजय, पवार राजु, चव्हाण विनोद, शिदे आदीच्या स्वाक्षर्‍या आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार