सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नांदेडच्या आमदाराला महापालिका कर्मचारी व पोलिसांचा दणका; विना मास्क फिरत असल्याने पाचशे रुपयांचा दंड

विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांविरोधात मोठ्या प्रमाणावर दंड वसुलीची कारवाई सुरू

Sudarshan MH
  • Sep 10 2020 6:43PM
पुणे दि.१०(अरविंद जाधव) : शहरातील कोरोनाची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता या साथीला अटकाव करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पुणे महापालिकेने शहर पोलिसांसोबत शहरात विना मास्क फिरणाऱ्यांविरुद्ध आणि थुंकी बहाद्दरणविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. काही लोकप्रतिनिधीही बेजबाबदारपणे वागू लागले आहेत.गुरुवारी ( दि. १०) सकाळी आपल्या आलिशान मोटारीमधून चार मित्रांसह विनामास्क जात असलेल्या नांदेडचेआमदार अमरनाथ अनंतराव राजूरकर यांना पालिका - पोलीस कर्मचाऱ्यांनी चांगलाच दणका दिला. या आमदाराकडून पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आमदाराने बघून घेण्याची धमकी दिल्यानंतरही आपल्या कर्तव्यापासून हे कर्मचारी जराही विचलित झाले नाहीत. 

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरांमध्ये पोलिसांच्या मदतीने विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांविरोधात मोठ्या प्रमाणावर दंड वसुलीची कारवाई सुरू आहे. आतापर्यंत शहरात वीस हजारपेक्षा जास्त लोकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी- कर्मचारी तसेच कोथरूड पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी शास्त्रीनगर चौकामध्ये कारवाई करत होते. .गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास आलिशान मोटारीमधून (एमच २६, बीआर ५९९९) चौघे विनामास्क जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी वाहन चालकाला गाडी थांबवण्याचा इशारा केला. परंतु, वाहन चालकाने गाडी थांबली नाही. तो तसाच भरधाव पुढे निघाला. गाडीतील सर्व विनामास्क असल्याने पोलिसांनी पाठलाग करून काही अंतरावर गाडी अडविली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी चालकाला तुम्ही सर्व विनामास्क फिरत असल्याने दंडाची पावती करावी लागेल असे सांगितले. त्यावर चालकाने हुज्जत घालत गाडीमध्ये आमदार बसले आहेत; त्यांची तुम्ही पावती करणार का असा प्रश्न केला. त्यावर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी हा नियम राज्य शासनाने केलेला असून सर्वसामान्य नागरिकांना आणि लोकप्रतिनिधींना नियम सारखेच आहेत असे सांगितले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार