सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

हदगाव येथील सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज यांचे निधन....

येथील श्री श्री श्री सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महास्वामी संजीवन समाधी

Sudarshan MH
  • Aug 28 2020 6:10PM
हदगाव दि.28(अरविंद जाधव) 
येथील श्री श्री श्री सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महास्वामी संजीवन समाधी ब्रहनमठाचे पीठाधिपती श्री श्री ष. ब्र. प्र.१०८ सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज यांचे दिनाक २८ रोजी सकाळी
रडार हट्टी (कर्नाटक) येथे हृदय विकाराच्या झटक्याने   वयाच्या ६५ व्यां वर्षी  दुःखद निधन झाले आहे.

हदगाव येथील जुन्या गावात ई.स.११६५ रोजी
श्री श्री श्री सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महास्वामी यांनी संजीवन समाधी घेतली आहे.या ब्रहनमठाचे पीठाधिपती म्हणून रडार हट्टी ता. आथनी जिल्हा विजापूर (कर्नाटक) येथील मूळचे रहिवाशी असलेले श्री श्री ष. ब्र. प्र.१०८ सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज यांचा १९९४ साली पट्टा अभिषेक सोहळा 
करण्यात आला तेव्हा पासून ते ब्रहनमठाची धुरा  सांभाळत होते.

त्यांनी १९९८ मध्ये महाराष्ट्र,कर्नाटक व आंध्रप्रदेश राज्यामधून मन्मथ ज्ञान ज्योत रथ यात्रा काढून वीरशैव लिंगायत धर्माचा प्रचार केला.तसेच मागील २२ वर्षांपासून श्री श्री श्री सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महास्वामी  संजीवन समाधी  हदगाव येथे श्रावण मासात रुद्र महाअभिषेक करून एक महिन्याचे अनुष्ठान करू लागले.
तसेच २००० साली हदगाव ते श्रीक्षेत्र कपिलधारा  पदयात्रा व पालखी यात्रेस प्रारंभ केला.या पद यात्रेला बारा वर्षे पूर्ण झाल्या बदल त्यांनी हदगाव येथे 
१२ शिवाचार्य महाराजांची पाद्यपुज्या करून १२०० लिंग,१२०० भस्म व १२०० शिवपाठ दान केले.
तसेच संजीवन समाधीवर ५१ फूट उंचीचे भव्य मंदिर उभारून २०१७-१८ रोजी उज्जैन येथील जगतगुरु यांच्या हस्ते व अनेक शिवाचार्यांच्या उपस्थितीत भव्य कलशारोहनचा कार्यक्रम घेतला.
त्यांनी नांदेड, परभणी,हिंगोली व यवतमाळ जिल्ह्यातील गावाेगावी जाऊन दरवषी अखंड शिवनाम सप्ताह करण्यास सुरुवात केली. हदगाव येथील मठात विविध धार्मिक कार्यक्रम घेऊन मोठ्या प्रमाणात  अन्नदान करून अनेक गोरगरीब जनतेला मदत करण्याचे कार्य केले.अशा या थोर संताचे  दुःखद निधन झाले आहे.त्यांच्या निधनाचे व्रत कळताच शहरासह तालुक्यात त्यांचे भक्त गण  शोक व्यक्त करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार