सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह पत्नी-मुलगाही कोरोनाबाधित

खासदार लोखंडे यांच्या वाहन चालकास काल त्रास जाणवू लागल्याने त्यांची रॅपीड तपासणी करण्यात आली.

Sudarshan MH
  • Aug 25 2020 8:13PM
खासदार लोखंडे यांच्या वाहन चालकास काल त्रास जाणवू लागल्याने त्यांची रॅपीड तपासणी करण्यात आली. त्या तो कोरोना पाॅझिटिव्ह आढळल्यानंतर खासदार लोखंडे यांनी तपासणीसाठी येथे  स्त्राव 
श्रीरामपूर ः शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह पाच जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. खासदार लोखंडे यांचा वाहन चालक कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने त्यांनी येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोनाची तपासणी केली. त्यात ते पाॅझिटिव्ह आढळुन आले. त्यानंतर आरोग्य विभागाने त्यांच्या पत्नीसह मुलगा व सुरक्षारक्षकाची रॅपीड तपासणी केली. त्यात ते कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. खासदारांचे चिरंजीवांनीच ही माहिती दिली.


खासदार लोखंडे यांच्या वाहन चालकास काल त्रास जाणवू लागल्याने त्यांची रॅपीड तपासणी करण्यात आली. त्या तो कोरोना पाॅझिटिव्ह आढळल्यानंतर खासदार लोखंडे यांनी तपासणीसाठी येथे घशातील स्त्राव दिले. तपासणीसाठी काल नगर येथील जिल्हा रुग्णालयात स्त्राव पाठविले होते. आज त्याचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यात खासदार कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. त्यानंतर आरोग्य विभागाने आज त्यांच्या पत्नीसह मुलगा व सुरक्षारक्षकाची रॅपिड तपासणी केली. त्यात ते तिघेही कोरोना पॉझिटिव्ह आले. खासदार लोखंडे यांच्यासह पाच जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.


खासदार लोखंडे आपल्या कुटूंबासमवेत तालुक्यातील उंबरगाव येथील निवास्थानी राहतात. तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी मुंबई येथील खासगी रुग्णालयात हलविले असल्याचे सुत्रांनी सांगितले. येथील ग्रामीण रुग्णालयात काल ६४ रुग्णांची रॅपिड तपासणी करण्यात आली. त्यात २० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात ६०० हुन अधिक नागरीकांना कोरोनाचा संर्सग झाला आहे. त्यातील अनेक रुग्ण उपचारानंतर बरे होवुन घरी परतले. अॅक्टीव रुग्णांवर येथील संतलुक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत १६ रुग्णांचा मृत्यू झाला. 

डाॅ. विखे पाटील फाऊंडेशनतर्फे माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या येथील संपर्क कार्यालयात नुकत्याच सुरु झालेल्या कोरोना तपासणी केंद्रात आतापर्यंत ६९ हुन अधिक रुग्णांची तपासणी झाली आहे. त्यात ३३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. येथील पालिकेच्या माजी उपनगराध्यक्षासह एका नगरसेविकेला कोरोना संसर्ग झाला आहे. त्यांनी येथील डॉ. आंबेडकर वसतीगृहात काल रॅपीड तपासणी केली असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार