सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अवैधरीत्या केलेल्या अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे, अन्यथा आंदोलन करू - बजरंग दल

संग्रामपुर येथील बजरंग दलाच्या वतीने निवेदन सादर

Sudarshan MH
  • Aug 22 2020 5:01PM
 बुलढाणा : संग्रामपुर येथील बजरंग दलाच्या वतीने निवेदन सादर करून अवैधरीत्या नियमांना डावलून मांस विक्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केलेले अतिक्रमण हटवण्याची मागणी तहसील कार्यालय नायब तहसीलदार व तामगाव पोलीस स्टेशन तसेच संग्रामपुर नगरपंचायत या सर्वाना निवेदना द्वारे करण्यात आली. 

सादर कलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, संग्रामपुर ते जळगाव रोडवरील पूलाजवळ रोडच्या बाजुला तसेच सार्वजनिक रस्त्यावर आणि शौचालया जवळ अतिक्रमण केले आहे. तेथे खुलेआम अतिक्रमण धारक अवैध कामे व मांस मच्छीची विक्रिची दुकाने लावली आहेत. रस्त्याला उतार असुन त्या रस्त्यावरून जाणारे शालेय विद्यार्थी तसेच येथून थोड्या अंतरावर पोलीस स्टेशन, रेणुका माता मंदिर आहे व आरोग्य रुग्णालय याला लागुन असुन अतिक्रमण धारक व ग्राहक खुप प्रमाणात गर्दी करतात. सार्वजनिक जागेवर पक्के टीन सेट, पोल, लोखंडी ऐन्गल द्वारा अतिक्रमण केले आहे.

हे सर्व अतिक्रमण तत्काळ नगर पंचायत कार्यालय संग्रामपुर व तहसीलदार यांनी अतिक्रमण काढण्याची कार्यवाही लवकरात लवकर करावी अन्यथा बजरंग दलाच्या वतीने सर्व बजरंग दल कार्यकर्ते उपोषणाला बसनार आहेत. यांची  सर्व कार्यालयानी नोंद घ्यावी असे निवेदन संग्रामपुर मधील बजरंग दल कार्यकर्ते यांनी सादर केले.

गावातील लोकांच्या मनामध्ये काही प्रश्न ऊठत आहेत की, अतिक्रमण केलेली जागा अधिकारी लोकांनी पैसे खाऊन तर कोनाच्या नावे केले नाही नाॽ अश्या प्रकारचे अनेक प्रश्न उठत आहेत. तरी संग्रामपुर नगर पंचायत ने या विषयीची सखोल माहिती जनते समोर मांडुन जनतेचे समाधान करावे असे निवेदनात सांगण्यात आले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार