सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शेतकऱ्यांना पीककर्ज वाढीव तसेच पेरणीआधी देण्यात यावे - प्रा. अनुजा सावळे

शेतकऱ्यांना वाढीव पीक कर्ज देण्याबाबत महिला राष्ट्रवादी काँग्रेसने दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..

Sudarshan MH
  • May 17 2021 6:57PM


शेतकऱ्यांना वाढीव पीक कर्ज देण्याबाबत महिला राष्ट्रवादी काँग्रेसने दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..

(योगेश शर्मा)
बुलढाणा : जिल्हयातील शेतमाल भाव उत्पादन सर्व्हे केले असता निदर्शरनास आले की, शेतकऱ्यांना मिळणारे पीक कर्ज कमी मिळत असुन वाढलेल्या खर्चापेक्षा कर्ज कमी असुन ते तुटपुंजे पडत आहे. आता पेरणी येऊ घातलेली असुन शेतकऱ्यांना पीक कर्ज वाढीव तसेच पेरणी आधी देण्यांत यावे अशी विनंती आज बुलढाणा जिल्हाधिकारी यांना आज दिनांक १७ मे रोजी एका निवेदनाद्वारे प्रा. सौ. अनुजा सावळे यांनी केली.

सदर निवेदन देतांना विधानसभा क्षेत्र अध्यक्ष नरेश शेळके, तालुकाध्यक्ष डी. एस. लहाने, शहराध्यक्ष अनिल बावस्कर, महिला जिल्हाध्यक्ष सौ अनुजा सावळे पाटील सह आदी उपस्थित हाेते. यावेळी सौ. अनुजा सावळे म्हणाल्या की, जगाचा पोशिंदा शेतकरी असून त्यास योग्यवेळी योग्य मदत भेटलीच पाहिजे. जिल्ह्यात सोयाबीन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. केलेल्या सर्व्हे नुसार प्रशासन यावर नक्कीच निर्णय घेऊन पीक कर्ज मर्यादा २३ हजार रुपये प्रति एकर वरून ४२ हजार रुपये प्रति एकर होईल ही अपेक्षा आहे. याबाबत आम्ही जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाला आज एक निवेदनाद्वारे ही विनंती केली असल्याचे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्रा. सौ. अनुजा सावळे पाटील यांनी सांगितले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार