सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा विद्यापीठाला विधीमंडळाची मंजूरी

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र २०२० च्या विधेयकास आज विधानमंडळाची एकमताने मंजूरी मिळाली. सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात विद्यापीठाच्या स्थापनेची घोषणा केली होती. हे विधेयक आज विधिमंडळाच्या अधिवेशनात सादर करण्यात आले होते अशी माहिती क्रीडा मंत्री सुनिल केदार यांनी दिली.

Snehal Joshi . सौजन्य- सत्ताधीश
  • Dec 15 2020 11:31PM

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र २०२० च्या विधेयकास आज विधानमंडळाची एकमताने मंजूरी मिळाली. सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात विद्यापीठाच्या स्थापनेची घोषणा केली होती. हे विधेयक आज विधिमंडळाच्या अधिवेशनात सादर करण्यात आले होते अशी माहिती क्रीडा मंत्री सुनिल केदार यांनी दिली.

राज्यात सध्या शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे सुरु आहे. या क्रीडा संकुलात विविध खेळांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध केल्या आहेत. या सुविधांचे अद्ययावतीकरण तसेच नवीन सुविधा उपलब्ध करण्याची कार्यवाही सातत्याने होत असते.यामूळे हे विद्यापीठ सध्या शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे कार्यान्वित करण्यात येणार आहे व नंतरच्या कालावधीत या विद्यापीठाकरीता स्वतंत्र इमारत बांधकाम करण्यात येईल. यासाठी अनावर्ती खर्च रु. २००.०० कोटी व विद्यापीठ कॉर्पस फंडसाठी रु.२००.०० कोटी याप्रमाणे एकुण रु. ४००.०० कोटी खर्च अपेक्षित असल्याचे केदार यांनी सांगितले.

राज्याची क्रीडा विषयक कामगिरी आणखी उंचावणे, क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असलेली विविध क्षेत्रे (Sports Science, Sports Management इ.) विचारात घेऊन क्रीडा क्षेत्रात नोकरीच्या, प्रशिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात व तरुण वर्गास क्रीडा क्षेत्रात येण्यास प्रोत्साहन मिळावे, या अनुषंगाने राज्यात जास्तीत जास्त दर्जेदार कोच/प्रशिक्षक तसेच, खेळाडू निर्माण व्हावेत, हा आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, महाराष्ट्र स्थापनेचा उद्देश असल्याचे त्यानी सागितले.

केदार हे म्हणाले,की या क्रीडा विद्यापीठाच्या स्थापनेसाठी आवश्यक अधिनियम प्रारुप तयार करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. विजय खोले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने सादर केलेल्या अधिनियम प्रारुप विधेयकास विधि व न्याय विभागाच्या मान्यतेनंतर मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आले होते. या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ प्रारुप विधेयक मंत्रिमंडळासमोर मान्यताही देण्यात आली होती

विद्यापीठ स्थापनेनंतर प्रथम वर्षी स्पोर्टस सायन्स ,स्पोर्टस टेक्नॉलॉजी व स्पोर्टस कोचिंग व ट्रेनिंग हे ३ अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहेत. याकरीता प्रत्येक अभ्यासक्रमात ५० विद्यार्थी प्रवेश संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर पुढील वर्षामध्ये मागणीनुसार व आवश्यकतेनुसार आणखी अभ्यासक्रम सुरु करता येतील.यामुळे शारिरीक शिक्षण, क्रीडा विज्ञान, क्रीडा वैद्यकशास्त्र क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा प्रशासन, क्रीडा व्यवस्थापन, क्रीडा माध्यम व कम्युनिकेशन, क्रीडा प्रशिक्षण यामध्ये शिक्षणाची व नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. तसेच, क्रीडा क्षेत्रातील तांत्रिक मनुष्यबळ देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. शारिरीक शिक्षण, क्रीडा शिक्षण यामध्ये संशोधन व विकास चांगल्या प्रकारे होईल अशी माहिती त्यांनी दिली.

विद्यापीठासाठी सध्याच्या आवश्यकतेनुसार ५ वर्षांकरीता २१३ पदे ( नियमित वेतनश्रेणीतील १६६ पदे व ठोक वेतनावरील ४७ पदे) निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये कुलगुरु, रजिस्ट्रार त्यांची कार्यालयीन पदे, शिक्षकीय पदे व प्रशासकीय पदे यांचा समावेश आहे. यापैकी पहिल्या वर्षी १३३ पदे (नियमित वेतनश्रेणीतील १०० पदे व ठोक वेतनावरील ३३ पदे) निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच मानधनावरील विशेष तज्ञ देखील आंमत्रित करण्याबाबत अधिनियमात तरतूद असल्याची माहिती केदार यांनी दिली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार