सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

माझं लातूर परिवाराच्या वतीने आयोजित मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

247 गरजू नेत्र रुग्णांची तपासणी यात 153 मोतीबिंदू रुग्ण असल्याचे निदान. या सर्व रुग्णांवर लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नेत्र विभागात तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मोफत शस्त्रक्रिया पार पडणार.

S.n.ranjankar
  • Dec 7 2021 1:30PM
माझं लातूर परिवार आणि विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नेत्र तपासणी शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शिबिराचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ सुधीर देशमुख आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ लक्ष्मण देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी माझं लातूर परिवाराचे मार्गदर्शक डॉ अर्चनाताई पाटील चाकूरकर, ज्येष्ठ विधिज्ञ ऍड बळवंत जाधव, ऍड. व्यंकट बेद्रे, डॉ बालाजी सोळुंके, नेत्र विभाग प्रमुख डॉक्टर उदय मोहिते, वैद्यकीय अधिक्षक डॉ संतोष डोपे यांची प्रमुख उपस्थिती होती.सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या माझं लातूर परिवारने गत दोन वर्षापासून लातूर शहरात विविध जन हिताचे उपक्रम हाती घेतले आहेत, याचाच एक भाग म्हणून लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माझं लातूर परिवाराच्या सदस्यांकडून तपासणी पूर्व नोंदणी करण्यात आली होती. सकाळी 9 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत चाललेल्या या शिबीराचा लाभ 247 नेत्र रुग्णांनी घेतला तर विक्रमी 153 नेत्र रुग्ण मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र असल्याचे निष्पन्न झाले. या सर्व रुग्णांवर शासकीय महाविद्यालयाच्या सुसज्ज अशा नेत्र विभागात दररोज 10 ते 15 या प्रमाणात शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती डॉ उदय मोहिते यांनी दिली आहे. शिबिराच्या यशस्वीतेसाठी माझं लातूर परिवाराच्या अभय मिरजकर, डॉ सितम सोनवणे, ऍड प्रदीप मोरे, प्रमोद गुडे, काशिनाथअप्पा बळवंते, दिपरत्न निलंगेकर, संजय स्वामी, गोपाळ झंवर, विनोद कांबळे, नारायण पावले, प्रा भालचंद्र येडवे, वामन पाठक, मासुम खान, अमर करकरे, रत्नाकर निलंगेकर, सचिन अंकुलगे, युवराज कांबळे, प्रशांत दुधमांडे, दीपक मिरकले, किशोर जैन, उमेश कांबळे, इम्रान नाईकवाडे, आनंद माने, आशा अयाचित, दत्तात्रय परळकर, भास्कर कुंभार, अजय वाघमारे, सुनिल गवळी, राजेश तांदळे, सचिन साळुंके, निलेश श्रॉफ, राजकुमार सोनी, प्रशांत साळुंके यांच्यासह माझं लातूर परिवाराच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार