सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या अंतर्गत ज्योतिष शास्त्र विषय सुरु करण्याचा निर्णय पालटू नये ; हिंदू जनजागृती समितीचे निवेदन

ज्योतिष विषय विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येऊ नये, या मागणीसाठी काही हिंदू धर्मविरोधी संघटनांनी निवेदन दिले आहे.

Nandurbar MH
  • Aug 26 2021 7:30PM

नवापूर प्रतिनिधी गणेश वडनेरे

             ज्योतिष विषय विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येऊ नये, या मागणीसाठी काही हिंदू धर्मविरोधी संघटनांनी  निवेदन दिले आहे. तथापि ज्योतिष शास्त्राचा कोणताही अभ्यास न करता  या संघटना सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी हा विरोध करत आहेत. तरी ज्योतिष्य ही भारतीय संस्कृतीतील एक महत्वपूर्ण प्राचीन विद्या आहे व इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या अंतर्गत ज्योतिष शास्त्र विषय सुरु करण्याचा निर्णय अत्यंत स्तुत्य असून तो बदलवू नये ; अशा मागणीचे निवेदन आज हिंदू जनजागृती समितीतर्फे जिल्हाधिकारी  यांना सादर करण्यात आले. 
     जिल्हाधिकारी यांच्या वतीने निवासी उप जिल्हाधिकारी खांदे यांनी निवेदन स्वीकारले. प्राध्यापक डॉक्टर सतीश बागूल,   राहुल मराठे, उज्वल राजपूत आणि चंद्रकांत भोई आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, ज्योतिष हे 'कालज्ञानाचे म्हणजे काळाची अनुकूलता किंवा प्रतिकूलता सांगणारे शास्त्र आहे. व्यक्तीच्या जन्मकुंडलीवरून तिचा स्वभाव, जन्मजात लाभलेली कला-कौशल्य-बुद्धी, व्यक्तीला पूरक कार्यक्षेत्र, जीवनाचा एकंदर दर्जा आदी अनेक गोष्टींसंदर्भात उत्तमप्रकारे बोध होते. आधुनिक विज्ञान सोडवू शकत नाही, अशा अनेक व्यक्तीगत अडचर्णीसंदर्भात ज्योतिषशास्त्र योग्य दिशादर्शन करते. समाजाला ज्योतिषशास्त्राची गरज आहे. ज्योतिषशास्त्रात तथ्य आहे, म्हणूनच ते सहस्रो वर्षे टिकले आहे काही थोड्या लोकांनी ज्योतिषाला विरोध केला, म्हणजे विज्ञानयुगात ज्योतिष थोतांड ठरत नाही, हा निर्णय सर्वोच्च न्यायालयानेही दिला आहे. आता आपल्या संविधानानेच एक प्रकारे 'ज्योतिष विज्ञान' असे म्हटलेले आहे, असं नमूद करून निवेदनात पुढे म्हटले आहे की, ३५ वर्षाच्या संशोधनानंतर मी छातीठोकपणे सांगू शकतो की, ज्योतिष हे शास्त्रच आहे', असे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (एनसीएल) निवृत शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ शुक्ल यांनी सांगितले आहे. तसेच राजस्थान गुजरात या राज्यांमध्ये ज्योतिष हा विषय शिकवण्यास आरंभ केला असून त्याला मिळणारा प्रतिसादही चांगला आहे, तेव्हा या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत की, शासनाने हा जो स्तुत्य निर्णय घेतला आहे तो कोणाच्य ही अभ्यासहीन दबावाला बळी पडून पालटू नये आणि ज्योतिष्य शास्त्र हा विषय विद्यापीठात सुरू करावा; असे निवेदनात म्हटले आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार