सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

समरधुरंधर मराठा सेनानी - श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे

श्रीशिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचे हिंदवी साम्राज्यात रुपांतर करणार्या थोरल्या श्रीमंत बाजीराव पेशव्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!!

Snehal Joshi .
  • Aug 18 2020 3:09PM
संपूर्ण हिंदुस्थानवर मराठ्यांचे राज्य निर्माण करणारे बाजीराव हे कुशल सेनानी आणि मुत्सद्दी होते. पालखेडच्या लढाईत निजामाचा पराभव, मोहम्मदखान बंगशचा पराभव आणि दिल्लीवर पहिली स्वारी करुन शिवछत्रपतींची स्वप्नपुर्ती करणारा पहिला मराठा म्हणजे बाजीराव पेशवा!! उदयपूरमधील प्रसंग!! बाजीराव उदयपूरला गेले,तेव्हा तेथील महाराणांनी उत्तम स्वागताची तयारी केली.राजसिंहासनाच्या बाजुला तेवढ्याच उंचीचे सिंहासन बाजीरावांसाठी बनवले गेले. बाजीराव दरबारात आले, सर्वांनी जयजयकार केला, महाराणा त्यांना सामोरे गेले आणि शेजारी बसण्याची विनंती केली पण बाजीराव मात्र सिंहासनावर न बसता पायरीवर बसले तेव्हा महाराणा म्हणाले"बाजीरावजी, "क्या हमसे कोई गलती हूई है ,कृपया सिंहासन पर विराजिये!" बाजीराव नम्रतापूर्वक म्हणाले "जी नही महाराज, यह सिंहासन महाराणा प्रताप का सिंहासन है, इसके साथ बैठने की मेरी योग्यता नही है,यह योग्यता तो केवल आपकी और छत्रपती शाहूमहाराज की है,मै तो केवल छत्रपती का एक तुच्छ सेवक हूॅं!!" बाजीरावांच्या शब्दांनी त्यांची कीर्ती आणि आदर अजूनच वाढला. येथून पुढचा प्रवास जयपुरकडे होता....तिथेही अंबरनरेश बाजीरावांच्या स्वागताची तयारी करत होते.....तिथेही उदयपूरप्रमाणेच दोन सिंहासन!! दरबारात मोठा सोहळा झाला.....मात्र इथे बाजीराव पायरीवर न बसता थेट सिंहासनावर जाऊन बसले.....सोहळा संपला, सोबतच्यां लोकांना संभ्रम झाला की उदयपूर आणि जयपुरला बाजीरावांनी वेगवेगळा व्यवहार का केला असेल? बाजीरावांनी त्यांना उत्तर दिले "उदयपूर अर्थात मेवाड हे महाराणा प्रतापांच्या स्वाभिमानाचे प्रतिक आहे,ज्यांनी कधीही मुघलांसमोर मान झुकवली नाही ,त्या गादीचा भक्तीभावाने आदर राखलाच पाहिजे,पण हे अंबरचे रजपुत राजे! यांनी आपला स्वाभिमान मुघलांना विकला,यांचा काय सन्मान करायचा? मेवाड ते मेवाडच!! हिंदवी स्वराज्याची मूहूर्तमेढ रोवणार्या श्रीशिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचे हिंदवी साम्राज्यात रुपांतर करणार्या थोरल्या श्रीमंत बाजीराव पेशव्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!!

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार