सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

केंद्राची मार्चपर्यंत कांदा निर्यातीवर बंदी; नाशिक जिल्ह्यातील शेतकरी रस्त्यावर

१९ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने ३१ डिसेंबरपर्यंत कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावले होते.

Patil
  • Dec 9 2023 9:05AM

उत्पादनाच्या वाढत्या स्थानिक किमतींना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने ३१ मार्च २०२४ पर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (Onion Farmers) निराश करणारा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Ban Onion Export) घातली आहे. ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यातबंदी राहणार असल्याचे परिपत्रक सरकारकडून काढण्यात आले आहे.

या निर्णयाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे त्यामुळे सरकारच्या या निर्णयानंतर शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून ठिकठिकाणा आंदोलनं सुरु केली आहेत. आशियातील सर्वात मोठी घाऊक कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगाव, चांदवड, नांदगाव, दिंडोरी, येवला, उमराणे आणि नाशिकमधील इतर ठिकाणीही शेतकऱ्यांनी लिलाव थांबवले. सरकारच्या या निर्णयानंतर लासलगाव, मनमाड, नांदगावसह बहुतांश बाजार समित्यात कांद्याचे लिलाव बंद आहेत. नाशिकच्या उमराणे येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मुंबई - आग्रा महामार्ग रोखला आहे.

एकीकडे अवकाळी आणि गारपिटीनं बळीराजा होरपळला आहे. शेतकऱ्याला हिवाळी अधिवेशना दरम्यान आर्थिक मदत होईल आणि दिलासा मिळेल अशी आशा होती. मात्र, केंद्र सरकारच्या या निर्णयाने शेतकरी वर्गात पुन्हा नाराजी पसरली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार