सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राज्यभरात शेतकऱ्यांचे शेतीमालाच्या हमीभावासाठी आंदोलने

उपराजधानीत हिवाळी अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे अवकाळी आणि दुष्काळजन्य परिस्थितीमुळे हैराण झालेले शेतकरी रस्त्यांवर उतरत आहेत.

Shruti Patil
  • Dec 11 2023 9:10AM

मुंबई: उपराजधानीत हिवाळी अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे अवकाळी आणि दुष्काळजन्य परिस्थितीमुळे हैराण झालेले शेतकरी रस्त्यांवर उतरत आहेत. रविवारीही आंदोलने सुरूच होती. ऐन हाताशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला. पिकांवर केलेला खर्चही न निघाल्याने आर्थिक संकट उभं झालं आहे. त्यात कांदा निर्यातीवर बंदी, ऊस आणि कांद्याचे कोसळलेले दर, सोयाबीन आणि कापूस उत्पादकांची झालेली कोंडी, यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.

नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदी त्वरित मागे घ्यावी, या मागणीसाठी प्रहार संघटना व शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हा मोर्चा अशोकस्तंभावरच अडवला.

पारनेर (अहमदनगर) मध्ये पारनेर बाजार समितीत रविवारी कांद्याचे भाव गडगडले. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले.

मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांकडून कापूस आणि सोयाबीनला समाधानकारक भाव देण्याची मागणी केली जात आहे. अवकाळी पावसामुळे आधीच पिकांचे नुकसान झाले. त्यात मातीमोल दरात शेतमाल विकावा लागत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार