सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जिल्हयातील तृतियपंथीयांसाठी जिल्हास्तरीय कल्याण समितीची स्थापना

तृतियपंथीयांकडे आधारकार्ड, मतदानकार्ड, रेशनकार्ड,बँक खाते इत्यादी उपलब्ध्‍ नाही अशा तृतियपंथीयांचे आधारकार्ड,मतदानकार्ड, रेशनकार्ड व राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते काढणे बाबत जिल्हाधिकारी महोदयांनी निर्देश दिलेले

S.n.ranjankar
  • Jul 28 2021 12:31PM


लातूर,दि.27 सामाजिक न्याय विभागाकडून तृतियपंथी यांच्या कल्याणाच्या योजना राबविल्या जातात.या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय तृतियपंथी कल्याण समिती स्थापन करण्यात आलेली असून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सदर समितीची दरमहा आढावा घेवून त्यांच्या कल्याणासाठी विविध निर्णय घेतले जाणार आहेत.
ज्या तृतियपंथीयांकडे आधारकार्ड, मतदानकार्ड, रेशनकार्ड,बँक खाते इत्यादी उपलब्ध्‍ नाही अशा तृतियपंथीयांचे आधारकार्ड,मतदानकार्ड, रेशनकार्ड व राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते काढणे बाबत जिल्हाधिकारी महोदयांनी निर्देश दिलेले होते.
त्यानुसार दि. 22 जूलै 2021 रोजी जिल्हयातील 12 तृतियपंथीयांचे आधारकार्ड काढण्यात आले व ज्या तृतियपंथीयांच्या आधारकार्डामध्ये दुरुस्त्या होत्या त्या दुरुस्त्याचे काम लातूर येथे पंचायत समिती कार्यालयातील सुविधा केंद्रात कँम्प आयोजित करुन करण्यात आले.
तसेच ज्या तृतियपंथीयांकडे राष्ट्रीयकृत बँकेचे बचत खाते काढलेले नाही अशा 12 तृतिपंथीयांचे भारतीय स्टेट बँकेमध्ये बचत खाते काढण्यात आले. यासमयी तहसीलदार स्वप्नील पवार उपस्थित होते.  व यापुढे शासकीय योजनेचा लाभ तृतियपंथीयांना मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे सांगितले. तहसिलदार लातूर यांचे कार्यालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी 12 लाभार्थ्यांचे अर्ज भरुन घेण्यात आले व 12 लोकांना या अगोदरच शिधापत्रिका वाटप करण्यात आलेल्या असून या शिधापत्रिका आधारर्काशी लिंक करण्याबाबत कार्यवाही करण्यात आली.
ज्या तृतियपंथीयाकडे मतदान कार्ड नाही अशा 07 लोकांचे मतदान कार्ड काढण्यातसाठी फॉर्म भरुन घेण्यात आले. तसेच जिल्हयातील ज्या तृतियपंथीयांकडे आधारकार्ड, मतदानकार्ड, रेशनकार्ड,बँक खाते इत्यादी मिळालेले नाही किंवा काढलेले नाही त्यांनी या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवकांत चिकुर्ते यांनी केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार