सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लॉकडाऊन’च्या काळात श्री गणेशाच्या विधीवत् पूजनासाठी मार्गदर्शक ठरणारे सनातनचे ‘गणेश पूजा आणि आरती’ अ‍ॅप !

गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या वातावरणामुळे भाविकांमध्ये आंनद आणि उत्साह संचारतो. यावर्षी मात्र या उत्साहावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे शासनानेही यावर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

स्नेहल जोशी. सौजन्य : सनातन संस्था
  • Aug 7 2020 1:21PM
गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या वातावरणामुळे भाविकांमध्ये आंनद आणि उत्साह संचारतो. यावर्षी मात्र या उत्साहावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे शासनानेही यावर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले आहे. दळणवळण बंदीच्या नियमांचे पालन करत गणेशोत्सव साजरा करावा लागत असल्याची खंत भाविकांच्या मनात असणे, हे स्वाभाविकच आहे. असे असले, तरी कोरोना किंवा अन्य कोणतेही संकट भक्तांच्या उपासनेत बाधा ठरू शकत नाही, हेही तितकेच सत्य आहे. या संकटकाळातही श्रद्धा आणि भावपूर्ण उपासना करणार्‍यांवर श्री गणेशाची कृपा झाल्याविना रहाणार नाही. यासाठी सनातन संस्थेच्या ‘गणेश पूजा आणि आरती अ‍ॅप’ हे भाविकांसाठी निश्‍चितच उपयुक्त ठरेल. ‘लॉकडाऊन’च्या संकटकाळातही या ‘अ‍ॅप’च्या माध्यमातून भाविकांना गणेशोत्सवाचा आध्यात्मिक लाभ मिळवता येईल. या अ‍ॅपमध्ये ‘श्री गणेशा’विषयी सर्वांगसुंदर अन् भक्तीभाव जागृत करणारे शास्त्रीय विवेचन देण्यात आले आहे. * ‘अ‍ॅप’द्वारे श्री गणेशाचा षोडशोपचार पूजाविधी करणे शक्य ! दळणवळण बंदीमुळे सर्व भाविकांना श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी पुरोहित उपलब्ध होतीलच, असे नाही. अशा वेळी या ‘अ‍ॅप’मधील सोप्या आणि सुलभ भाषेतील पूजाविधी हा जणू पुरोहितच पूजाविधी सांगत असल्याचा अनुभव भाविकांना करून देणारा आहे. यामध्ये पूजाविधीसाठी लागणारे साहित्य, पूजेसाठी करावयाची सिद्धता, नैवेद्य या माहितीसह षोडशोपचार पूजाविधीचा ‘ऑडिओ’ही उपलब्ध आहे. यातील प्रत्येक उपचार श्री गणेशाच्या चरणांपर्यंत पोचेल, या भावाने सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे हा पूजाविधी भाविकांचे निश्‍चितच समाधान करेल. हे अ‍ॅप मराठी, हिंदी, कन्नड आणि इंग्रजी या 4 भाषांमध्ये उपलब्ध आहे. * श्री गणेशाप्रती भाव वृद्धींगत करणारे अ‍ॅप ! श्री गणेशाची माहिती ‘ऑनलाईन’ही उपलब्ध आहे. याविषयी माहिती देणारे अनेक ‘अ‍ॅप्स’ही आहेत; मात्र सनातनचे ‘गणेश पूजा आणि आरती’ हे अ‍ॅप साधनेची अनुभूती घेतलेल्या साधकांनी सिद्ध केले आहे, हे या ‘अ‍ॅप’चे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे यातील प्रत्येक सदर हे भाविकाला गणेशोत्सवाचा आध्यात्मिक लाभ करून देणारे आहे. कोणताही व्यावसायिक हेतू न ठेवता ‘भाविकाच्या मनातील श्री गणेशाप्रतीचा भाव वृद्धींगत व्हावा’, असा भाव ठेवून या ‘अ‍ॅप’ची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे हे ‘अ‍ॅप’ भाविकांना निश्‍चितच श्री गणेश पूजाविधीचा आध्यात्मिक लाभ मिळवून देणारे आहे. * विविधांगी आणि वैशिष्ट्यपूर्ण ! श्री गणेशाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत श्री गणेशाची कशी विविधांगाने उपासना करता येईल ?, अशी माहिती या ‘अ‍ॅप’मध्ये देण्यात आली आहे. श्री गणेशाचे आगमन कसे करावे ? याचा ‘व्हिडिओ’, श्री गणेशाची स्थापना आणि षोडशोपचार, नियमितचा पूजाविधी आदींचा ‘ऑडिओ’ श्री गणेश आणि अन्य देवता यांच्या सात्त्विक साधकांनी गायलेल्या आरत्या, श्री गणेशतत्त्व आकृष्ट करणारी रांगोळी, ती काढण्याची पद्धत, दूर्वा-मोदक-लाल फूल या श्री गणेशाला प्रिय असलेल्या गोष्टींमागील भावार्थ, श्री गणेशाचा नामजप, श्री गणेशाची उपासना कशी करावी ?, श्री गणेशस्तोत्र, अथर्वशीर्ष यांचे ‘ऑडिओ’, श्री गणेशाची तीर्थक्षेत्रे, श्री अष्टविनायकांचा इतिहास, आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ? आदी वैशिष्ट्यपूर्ण माहितीही या ‘अ‍ॅप’मध्ये उपलब्ध आहे. * धर्मशास्त्रानुसार उपासनेची माहिती देणारे ‘ऑडिओ-व्हिडिओ’ ! श्री गणेशाची मूर्ती घरी आणण्याची पद्धत, श्री गणेशाच्या स्थापनेपासून उत्तरपूजेपर्यंत करावयाच्या नित्य कृती, दूर्वा-मोदक-लाल फूल यांचे श्री गणेशाच्या उपासनेतील महत्त्व, हरितालिका, गौरीपूजन, ऋषिपंचमी, सार्वजनिक गणेशोत्सवातील टाळावयाचे अनुचित प्रकार, श्री गणेशमूर्तीचे विसर्जन यांविषयी या ‘अ‍ॅप’मधील धर्मशास्त्रावर आधारित ‘व्हिडिओ’, हे भाविकांसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरतील. यासह अ‍ॅपमध्ये अथर्वशीर्ष, संकटनाशन स्तोत्र, श्री गणेशाचा नामजप, मंत्रपुष्पांजली आदींचे ‘ऑडिओ’ही उपलब्ध आहेत. * गणेशमूर्तीच्या वैज्ञानिक चाचणीच्या मोजमापाचे अद्वितीय संशोधन ‘अ‍ॅप’ मध्ये उपलब्ध ! आधुनिकतेच्या नावाखाली सध्या क्रिकेट खेळणारा, हेल्मेट घातलेला, राजकीय नेत्यांच्या रूपात अशा श्री गणेशाच्या रूपाशी विसंगत मूर्ती सिद्ध केल्या जातात. यासह कागदी लगदे, भाज्या, टाकाऊ वस्तू आदींपासूनही अशास्त्रीय मूर्ती बनवल्या जातात. अशा अशास्त्रीय मूर्ती आणि चिकणमातीपासून सिद्ध केलेली सात्त्वि श्री गणेशमूर्ती यांच्या वैज्ञानिक परीक्षणाचा अभ्यास या ‘अ‍ॅप’ मध्ये विस्तृतपणे देण्यात आला आहे. वैज्ञानिक यंत्रांद्वारे करण्यात आलेल्या परीक्षणाचा अभ्यासातून गणेशोत्सव शास्त्रानुसार साजरा करण्याचे महत्त्व भाविकांच्या लक्षात येईल आणि शास्त्र विसंगत उत्सव साजरा करण्यातून होणारी हानी टाळता येईल. सनातनचे ‘गणेश पूजा आणि आरती अ‍ॅप’ केवळ पूजाविधी सांगणारे नसून भाविकांना श्री गणेशाच्या उपासनेसाठी मार्गदर्शन करणारे आहे. त्यामुळे हे ‘अ‍ॅप’ स्वत: ‘डाऊनलोड’ करून आपले मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, हितचिंतक आणि आपल्याशी जोडलेल्या प्रत्येकापर्यंत हे ‘अ‍ॅप’ पोचवल्यास त्यांनाही श्री गणेशाच्या उपासनेचा लाभ होईल. श्री गणेश सर्व विघ्नांचा समूळ नाश करण्यासाठी समर्थ आहे. त्याची श्रद्धेने उपासना केल्यास कोरोनाचे विघ्नही तो निश्‍चितच दूर करेल. ‘गणेश पूजा आणि आरती’ हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठीच्या मार्गिका - 1. Android App : sanatan.org/ganeshapp 2. Apple iOS App : sanatan.org/iosganeshapp

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार