सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

'एक गाव-एक कार्यकर्ता-एक तिरंगा' या अभियानाद्वारे धुळे जिल्ह्यातील ७५०० कुटुंबानं पर्यंत पोहोचण्याचा संकल्प - प्रदेश मंत्री श्री सिद्धेश्वर लटपटे.

धुळे जिल्ह्यातील ७५०० कुटुंबानं पर्यंत पोहोचण्याचा संकल्प - प्रदेश मंत्री श्री सिद्धेश्वर लटपटे.

Nandurbar MH
  • Aug 12 2021 3:16PM


 अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संपूर्ण देशात 'एक गाव-एक कार्यकर्ता-एक तिरंगा' हे अभियान येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिना निमित्ताने राबविणार आहे. या अभियानासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात योजना करण्यात आलेली आहे. त्याच अनुषंगाने धुळे जिल्ह्यात देखील चार तालुक्यांसाठी ही योजना करण्यात आलेली आहे.
  

धुळे जिल्ह्यातील चार तालुक्यात ६५ ठिकाणी सार्वजनिक ध्वजारोहण कार्यक्रम व १४२ गावातील ७५०० कुटुंबात भारत माता प्रतिमा पूजन व 'घर घर तिरंगा - मन मन तिरंगा' हे ब्रीद घेऊन घरावर राष्ट्र ध्वज लावण्यात येणार आहेत. तालुका, शहर व गावासाठी अभियान प्रमुख म्हणून कार्यकर्त्यांना जबादारी देण्यात आलेली आहे. या अभियानात जिल्हाभरात एकूण २८७ कार्यकर्ते सक्रिय सहभागी होणार आहेत. या अभियानाच्या माध्यमातून गाव, वस्ती, पाडा व कॉलनीतील घरेघरी प्रत्येक नागरिकांन पर्यंत पोहोचून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थी परिषद नागरिकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. आगामी वर्षभर विद्यार्थी परिषद देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करणार आहे त्याच प्रमाणे धुळे जिल्ह्यात विविध ७५ कार्यक्रमांची योजना वर्षभरासाठी करण्यात आल्याची माहिती धुळे अभियान प्रमुख निखिल तायडे यांनी प्रसार माध्यमांना दिली.  धुळे जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळ, दुर्गा मंडळ, महिला बचत गट, सामाजिक संस्था व नागरिकांनी या अभियानांतर्गत सार्वजनिक ध्वजारोहण व भारत माता पूजनाचे कार्यक्रम करावेत असे आवाहन अभाविप महाराष्ट्र प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे यांनी केले. तसेच एक गाव-एक कार्यकर्ता-एक तिरंगा या अभियानाचे पोस्टर  प्रकाशित करण्यात आले. यावेळी अभाविप शहर मंत्री भावेश भदाणे व निखिल तायडे हे उपस्थित होते.

(हे प्रसिद्धीपत्रक अभाविप जिल्हा कार्यालय मंत्री विजय पंचरीया यांनी प्रसिद्धीस दिले आहे)

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार