सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पोलीस चौकीचे उदघाटन तर झाले. मात्र पोलीस चौकी बंदच*

पोलिस चौकी चा आता सध्या ताबा कुणाकडे? कोण त्या चौकी चा उपभोग घेतो? सार्वजनिक बांधकाम विभागाला याची कल्पना आहे का? पोलिस विभागाला इमारत सुपूर्द केली तर. ठेकेदार ने काम पूर्ण करून दिले की नाही? काम पूर्ण झाले नसेल तर बिल काढले की नाही मग चौकी सुरू का झाली नाही? असा प्रश्न जागरूक नागरिक करीत आहे.

Snehal Joshi .
  • Jul 25 2020 3:45PM
रामटेक स्थानिक महात्मा गांधी चौकातील पोलीस चौकी लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आली. पण ती पोलीस चौकी बंदच आहे. एकीकडे कोरोणा च्या संकटाने थैमान घातले आहे. कोरोना रुग्ण च्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.रामटेक तालुका पर्यटनाचे क्षेत्र असल्याने लांबचा पल्ला गाठला भाविक , नागरिकांची चहल पहल, आवागमन मोठ्या प्रमाणात सुरू असते , महिला, पुरुष यांची सतत वर्दल असल्याने येथे सकाळ पासूनच लोकांची गर्दी होते . त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. कित्येकदा अपघात देखिल झाले आहेत.मोठ्या अपघात्ताची पुलिस वाट तर बघत नाही ना ? असा यक्ष प्रश्न जागरुक नागरिकांना पडतो आहे .चोर देखील संधीचा फायदा घेतात. लोकांचे मोबाईल चोरी जातात. नागरिकांचा सौरक्षणा करीता असलेली ही इमारत फक्त शोपीस म्हणून आहे. उभे असलेल्या वाहनातून वाट काढणे खूप अवघड होते. उद्घाटन होताच चौकी सुरू होईल असे वाटत होत पण पोलीस चौकी चे दार आतापर्यंत उघडलेच नाही. चौकात आणि बाजारात कोणती मोठी घटना घडली तर पोलीस स्टेशन गाठावे लागते. त्यामुळे भुरटे चोर, अपघात करणारे पळून जाते. . नवीन पोलीस चौकीचे उदघाटन तर झाले अनेक दिवसापासून प्रलम्बीत प्रश्न ज्याची गांधी चौकात खरी गरज होती. अखेर पुलिस चौकीचे रामटेक गांधी चौक, येथील पोलीस चौकीचे उदघाटन झाले .चौका मध्ये पोलीस चौकी असल्याने पोलिसांची तिथे ड्यूटी असल्याने पार्किंग , ट्राफिक समस्या , रोड रोमियो तसेच इतर बाबींवर नियंत्रण येईल. असे पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यानी सांगितले. इथे एक पोलीस उपनिरीक्षक , एक राइटर , दोन पोलीस कॉन्स्टेबल यांची ड्यूटी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. आधीची पोलीस चौकी जी होती तिथे फ़क्त रात्री झौपण्या करीताच पोलीस येत असे . असला प्रकार ह्यावेळी होणार नाही अशी ग्वाही देखिल त्यांनी ह्यावेळी दिली . लवकरच पोलिस चौकी सुरू करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. लोकप्रतिनिधी ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता सुनील दमाहे , पोलीस निरीक्षक दिलीप ठाकुर व मान्यवर मंडळीं च्या प्रमुख उपस्थितीत पुलिस चौकीचे उद्घाटन सम्प्पन झाले होते. त्यामुळे पोलिस चौकी त्वरित सुरू करण्याची मागणी जोर पकडत आहे. . सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता सुनील दमाहे यांच्याशी विचारणा केली असता ते म्हणाले की, बांधकाम विभागाने इमारत बांधणीचे काम पूर्ण केले. बांधकाम झाल्यानंतर पोलीस चौकी ची चाबी सुद्धा पोलीस प्रशासन ला सोपवण्यात आली आहे. प्रत्यक्षात इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. तेव्हाच इमारतीचे उद्घाटन झाले आहे. असे मत व्यक्त केले. पोलिस चौकी चा आता सध्या ताबा कुणाकडे? कोण त्या चौकी चा उपभोग घेतो? सार्वजनिक बांधकाम विभागाला याची कल्पना आहे का? पोलिस विभागाला इमारत सुपूर्द केली तर. ठेकेदार ने काम पूर्ण करून दिले की नाही? काम पूर्ण झाले नसेल तर बिल काढले की नाही मग चौकी सुरू का झाली नाही? असा प्रश्न जागरूक नागरिक करीत आहे. आणि पोलीस चौकी सुरू होण्यासाठी चातक पक्षाप्रमाणे वाट बघत आहेत. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार