सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पिंपरी चिंचवड़ शहरात श्री स्वामी समर्थ महासत्संग सोहळा -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे च्या उपस्थितीत संपन्न....

लोकसेवा हाच खरा अध्यात्म असल्याची शिकवण प.पु.गुरुमाऊलीं च्या विचारातून मिळते- मुंख्यमंत्री एकनाथ शिन्दे

Deepak Chavhan
  • Feb 12 2023 12:43AM
पिंपरी चिंचवड़ शहरातील मोशी येथे श्री स्वामी समर्थ महासत्संग सोहळा व श्री स्वामी समर्थ गुरीपिठ चे संस्थापक परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचे प्रवचन व दर्शन सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होतें ह्या महासत्संग सोहळ्याला महाराष्ट्र राज्या चे मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणें जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे,आमदार संजय शिरसाठ, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, देहू संस्थानचे विश्वस्त ह.भ.प. नितीन महाराज मोरे, आळंदी संस्थानचे विश्वस्त ॲड. विशाल ढगे पाटील, जेजुरी संस्थानचे विश्वस्त तुषार साने, पिंपरी चिंचवड संस्थानचे विश्वस्त   तांबे महाराज, दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे ॲड.  शिवराज कदम,स्वामी समर्थ गुरीपिठ चे चंद्राकात दादा मोरें,युवका चे प्रेरणास्थान नितीन भाऊ मोरे, स्वामी समर्थ केंद्रा सतीशजी मोठे व  स्वामी समर्थ भक्त परिवार  सेवक उपस्थित होते.

ह्या या सत्संगामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि परमपूज्य गुरुमाऊलीं चे लोककल्याणाचे कार्य अविरतपणे सुरू आहे. दिंडोरी येथे सात दशकापासून सामाजिक सुधारणेसाठी सेवामार्ग, व्यसनमुक्ती, बालसंस्कार, महिला सक्षमीकरण, आयुर्वेद, स्वयंरोजगार, बिना हुंडा सामुहिक विवाह असे अनेक समाजाच्या हिताचे उपक्रम ते राबवितात. सामाजिक विकासाचे व्रत अंगिकारताना हजारो सेवा केंद्राच्या माध्यमातून विश्वशांतीचा संदेश देत भारतीय परंपरा आणि संस्कृतीचा गौरव जगभरात पसरवत आहेत.गुरुमाऊलींच्या माध्यमातून जनतेच्या हितासाठी शासन जनतेच्या समस्या सोडविण्याचे कार्य केले जाते. इथे येणारा प्रत्येक माणूस प्रत्येकाला काही तरी देऊन जाणारा आहे. म्हणून असा सोहळा ही समाजाची गरज आहे. परमेश्वराशी समाजाच्या उन्नतीसाठी इथे संवाद साधला जात असल्याने हा सोहळा खऱ्या अर्थाने महासत्संग ठरतो, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांनी सोहळ्याच्या आयोजनाचे कौतुक केले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, गुरुमाऊली सांगत असलेला परमार्थ मार्ग जनतेच्या हिताचा, उन्नतीचा मार्ग आहे. दुसऱ्यासाठी जगण्यासाठी वेगळा आनंद असतो ही भावना सोहळ्यात सहभागी होऊन मिळते. आध्यात्माची जोड समाजाच्या उन्नतीसाठी घालण्याचा आदर्श प्रस्तूत करणारे हे कार्य असेच सुरू रहावे, अशा शब्दात त्यांनी सोहळ्याला शुभेच्छा दिल्या.

त्याच बरोबर पालकमंत्री चंद्राकात दादा पाटील यांनी ही ह्या सत्संगाला उपस्थित लाखो सेवेकर यांना मार्गदर्शन केले  आसुन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले कीआध्यत्मिकतेचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून माऊलींकडे बघितले जाते.माणसाची सेवा हाच परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग असल्याची शिकवण ते  देत आहेत. कोरोना काळात त्यांनी केलेल्या सेवाकार्याने याची प्रचिती आली आहे. सत्संगाच्या माध्यमातून युवकांना रोजगार देण्याचे कार्य करण्यात येत आहे.

माऊली अण्णा साहेब मोरे म्हणाले,संतांनी, महापुरुषांनी दुसऱ्यासाठी जगण्याची शिकवण आपल्याला दिली असून ही शिकवण नवीन पिढीपर्यंत पोहचविण्याचे काम करावे. घरा घरात आदर्श नागरिक तयार झाले पाहिजे, निर्व्यसनी पिढी तयार झाली पाहिजे. निसर्गाचे संरक्षण करुन त्यांचे संवर्धन करावे.आसे गुरु मावली यांनी ही आपरल्या प्रवचना द्वारे उपस्थित लाखों स्वामी भक्तांना संबोधित केले...

श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्रंबकेश्वर या ठिकाणी विविध प्रकारचे जे उपक्रम व भक्ती मार्ग साधना केल्या जाते ते माणसाच्या जीवनात एक वेगळा बदल घडवण्याचे कार्य या ठिकाणी निष्काम कर्मयोगी भावनेने केल्या जाते व देव देश धर्म च्या प्रती श्री स्वामी समर्थ महा सत्संगाद्वारे विविध कार्यक्रम श्री स्वामी समर्थ गुरुपीठाद्वारे प्रती वर्ष साजरी केल्या जातात आज पिंपरी चिंचवड शहर व मोशी परिसरामध्ये लाखोच्या संख्येने भाविक भक्त आपल्या परिवारासह या सत्संगाला उपस्थित होते संपूर्ण परिसर हा भक्तिमय वातावरणामध्ये तल्लीन झाला होता....
 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार