सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मल्हारी मार्तंड खंडेराया, राज्यातील जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी येऊ दे -मुख्यमंत्री शिन्दे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंडोबाच्या चरणी साकडे

Deepak Chavhan
  • Aug 2 2022 7:54PM
पुणे दि. २ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेजुरी देवस्थान येथील श्री खंडोबारायाचे दर्शन घेतले.राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे, चांगला पाऊस पडून राज्य सुजलाम-सुफलाम होऊ दे.राज्यातील जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी येऊदे, राज्याचा सर्वांगिण विकास होऊ दे. राज्यातील जनता सुखी होऊ दे, असे साकडे त्यांनी यावेळी खंडोबारायाच्या चरणी घातले. 

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे,  जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आदी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, जेजुरी देवस्थान परिसर विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. देवस्थान परिसराच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. जेजुरी गडाचे जतन व संवर्धनासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असेही ते म्हणाले. 

दर्शन घेतल्यानंतर श्री खंडोबा देवतालिंग कडेपठार ट्रस्ट, जेजुरी येथील मंदिराचा कलशपूजन समारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. यावेळी विश्वस्त तुषार शहाणे, राजकुमार लोढा, शिवराज झगडे, पंकज निकुडे, संदीप जगताप, अशोक संकपाळ, प्रसाद शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार