सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जिहादी आतंक्याच्या विरोधात विहिंप बजरंग दल कडून भोसरी येथे निषेध आंदोलन

जीहाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत पुतळ्याचे दहन करून तीव्र निषेध

Deepak Chavhan
  • Jul 1 2022 5:42PM

पुणे:- देशात सध्या इस्लामी कट्टरपंथी अतिरेकी जिहाद्यानी आमोठा नंगाना सुरू केला असून महाराष्ट्रातील अमरावती येथे २१ जूनला उमेश कोल्हे व राजस्थान उदयपुर येथे २८ जूनला कन्हैयालाल तेली यांनी नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ समाजमाध्यमावर पोस्ट व्हायरल केल्याच्या आरोपाखाली जिहादी मानसिकतेच्या धर्मांधाकडून आतंकवादी पद्धतीने गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. या निर्घृण हत्येविरोधत महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली असून त्याचे उमटलेले पडसाद सर्वत्र पाहण्यास मिळत आहे.

या इस्लमिक जिहादच्या विरोधात फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम अशा अनेक समाजमाध्यमावर हिंदू समाजाचा मोठ्या प्रमाणावर आक्रोश दिसून येत आहे.हिंदू समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून, सेवा, सुरक्षा, संस्कार रूपात समाजाला एकत्रित आणून समाज्याच्या हित आणि रक्षणासाठी सदैव रस्त्यावर उतरून प्रत्येक संकटाला सामोरे जाऊन लढा देणारी संघटना म्हणजे विश्व हिंदू परिषद.इस्लामिक जिहादी मानसिकतेचा समूळ नायनाट व्हावा यासाठी

 विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल चिंचवड जिल्ह्याच्या नेतृत्वात समस्त हिंदू समाजाकडून गुरुवार दि. ३० जून २०२२ रोजी सायंकाळी ६ वा. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, पीसीएमटी चौक, भोसरी येथे जीहाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत पुतळ्याचे दहन करून तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी या इस्लामिक जिहादच्या मानसिकतेने करण्यात येणाऱ्या हिंदू समाजावरील अत्याचारावर वेळीच उपायोजना व्हायला पाहिजे अशी मागणी सरकार आणि पोलीस प्रशासनाला करण्यात आली.

यावेळी विश्व हिंदू परिषद, पुणे ग्रामीण विभाग मंत्री नितीनजी वाटकर बोलताना "नुपूर शर्माना पाठिंबा देणाऱ्या कन्हैयालाल यांची हत्या करणाऱ्यांनी आतापर्यंत जाकिर नाईक व मौलाना असीम अल हकीमला का जिवंत ठेवले आहे. तथकथित फॅक्ट चेकर मुहम्मद झुबेरला हिंदू देवदवतांच्या अवमानाखातर अटक करण्यात आली असताना त्याच्या समर्थनार्थ संपूर्ण मुस्लीम समाज त्याच्या बरोबर आहे. याच प्रकारे नुपूर शर्माने केलेल्या इशनिंदेच्या आरोपावरून तिच्या अटकेची मागणी केली जात आहे. याच मानसिकतेतून कन्हैयालाल, उमेश कोल्हे, कमलेश तीवरी आणि अशा अनेक लोकांची हत्या करण्यात आली आहे. गुस्ताख-ए-नबी की एक ही सजा, सर तन से जुदा म्हणत कोणत्याही व्यक्तीची धर्माचे नाव घेऊन हत्या करणे कितपत योग्य" असा प्रश्न शासन आणि पोलीस प्रशासनाला केला.


 या निषेध आंदोलन प्रसंगी विहिंप प्रांत निधी प्रमुख धनाजी मामा शिंदे, प्रांत मातृशक्ती पालक आप्पा कुलकर्णी, पाठक काका, प्रांत बजरंग दल सह संयोजक नितीनजी महाजन, प्रांत बजरंग दल गोरक्षा प्रमुख मंगेश नढे, विहिंप पुणे ग्रामीण विभाग मंत्री नितीनजी वाटकर, पुणे ग्रामीण विभाग बजरंग दल सह संयोजक कुणाल भाऊ साठे, चिंचवड जिल्हा अध्यक्ष शरदराव इनामदार सर, जिल्हा मंत्री धनंजय गावडे, विशेष संपर्क प्रमुख संजयजी शेळके, गोरक्षा प्रमुख निलेश चासकर, क्षमाताई कुलकर्णी धर्म जागरण विभाग, युवराज पाटील, अभिजीत चव्हाण तसेच हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व वीर बजरंगी मोठ्याप्रमणावर उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार