सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महापारेषणच्या वीजवाहिनीत बिघाड; पुणे शहरातील ४.५७ लाख वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

महापारेषणकडून पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहेत.

Sudarshan MH
  • Apr 24 2025 6:46AM
पुणे: पुणे महापारेषणच्या ४०० केव्ही जेजूरी टॉवर लाइनमध्ये बिघाड झाल्यामुळे बुधवारी (दि. २३) रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास पुणे शहरातील अतिउच्चदाब व उच्चदाबाच्या उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला. परिणामी कोथरूड, हडपसर, सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, वडगाव धायरी, सिंहगड रस्ता, नऱ्हे, येवलेवाडी, एनआयबीएम रस्ता, पर्वती, पेशवेपार्क, मंडई, फुरसुंगी आदी भागातील सुमारे ४ लाख ५७ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा देखील खंडित झाला.
 
दरम्यान महापारेषणकडून भारव्यवस्थापनाद्वारे पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. या सर्व भागात रात्री ११.३० ते ११.४५ वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरू होईल अशी शक्यता आहे.  
 
गेल्या दोन - तीन दिवसांपासून उष्णतेची प्रचंड लाट आली आहे. पर्यायाने विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे महापारेषणच्या काही अतिउच्चदाबाचे उपकेंद्र व वीजवाहिन्यांवर ताण येत आहे. त्यातच महापारेषणच्या जेजुरी ४०० केव्ही जेजूरी टॉवर लाइनमध्ये आज रात्री ९.४५ वाजता बिघाड झाला. तसेच पारेषण वाहिन्यांमध्ये विजेची मोठी तूट निर्माण झाली. त्यामुळे पारेषण यंत्रणेतील संभाव्य धोके व बिघाड टाळण्यासाठी स्वयंचलित भारव्यवस्थापन यंत्रणा म्हणजेच ‘एलटीएस’ (Load Trimming Scheme) यंत्रणा कार्यान्वित झाली. परिणामी फुरसुंगी, कोथरूड, नांदेड सिटी, पर्वती येथील महापारेषणचे अतिउच्चदाबाचे उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला. त्यामुळे कोथरूड, हडपसर, सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, वडगाव धायरी, सिंहगड रस्ता, नऱ्हे, येवलेवाडी, एनआयबीएम रस्ता, पर्वती, पेशवे पार्क, मंडई, फुरसुंगी परिसरातील सुमारे ४ लाख ५७ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला. दरम्यान महापारेषणकडून पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार