सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राज्यात मुली व महिला सुरूक्षित आहेत का?

महाराष्ट्रात मुली व महिला बेपत्ता होण कोरोना पेक्ष्या ज्यास्त घातक:- गणेश वाळके

Mh
  • May 8 2023 10:11PM
 
 
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य ही संतांची, महापुरुषांची भूमी आहे, ज्या राज्यात महिलांना आईचा बहिणींचा मान मिळतो, त्याच महाराष्ट्रात मुली व महिला बेपत्ता होण हे खूप भयानक प्रकार आहे, राज्यात मुली व महिला बेपता होण्याचे प्रमाण मोठ्या संख्या वाढत असून सध्या महाराष्ट्रत भीतीच वातावरण आहे.
जानेवारी महिन्यात महाराष्ट्रातून १६०० मुली बेपत्ता झाल्या, फेब्रुवारी महिन्यात १८१० तर एप्रिल महिन्यात २२०० मुली बेपत्ता झाल्या आहेत. दिवसेंदिवस बेपत्ता होणार्‍या मुली आणि महिलांची संख्या वाढते आहे हे आपल्यासाठी चिंताजनक आहे. यासाठी खरंतर फार मोठी यंत्रणा कार्यरत असणं आणि त्या यंत्रणेचा वापर केला जाणं आवश्यक आहे. पण तसं होताना दिसत नाही. महाराष्ट्रात मुली व महिला सुरूक्षित आहेत का? असा प्रश्‍न निर्माण होत आहे.
ग्रामीण भागातून मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढले
महत्त्वाचं म्हणजे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण जास्त असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये पुणे, नाशिक, अहमदनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे प्रमाण जास्त असल्याचं स्पष्ट आहे. मार्च महिन्याची आकडेवारी पाहता, पुण्यातून २२५८ मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यानंतर नाशिकमधून १६१, कोल्हापूर ११४, ठाणे १३३, अहमदनगर १०१, जळगाव ८१ तर सांगलीतून ८२ मुली बेपत्ता झाल्या आहेत.
ज्या मुली बेपत्ता झाल्या आहेत त्यामध्ये फक्त अल्पवयीन मुलींचा समावेश नाही. त्या मुलींची ओळख जाहीर केली जात नाही. १८ वर्षांवरील मुली आणि महिलांचाही या यादीत समावेश आहे. प्रेम प्रकरण, लग्नाचं आमीष, नोकरीचं आमीष या सगळ्याला बळी पडून बेपत्ता होण्याचं प्रमाण अधिक आहे.
महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था अशा दोन्ही गोष्टी योग्य पद्धतीने राबवल्या जात आहेत असं वारंवार सरकारकडून सांगितलं जातं आहे. अशात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात रोज सरासरी ७० मुली गायब होत आहेत. जानेवारी ते मार्च २०२३ या कालावधीत महाराष्ट्रातून ५ हजार ५१० मुली बेपत्ता झाल्या आहेत. 
महाराष्ट्रात मुली व महिला सुरक्षित आहेत का? याची महाराष्ट्र राज्य सरकारने नागरिकांना खात्री करून द्यावी.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार