सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

50 व्यां तालुकास्तरीय विज्ञान व गणित प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना मिळाली : पोलीस निरीक्षक सुरेश चाटे

विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा उषाताई किरण कुमार गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदर्शन संपन्न

Abhimanyu Phad
  • Jan 14 2023 9:17PM
परळी : दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल येथे गटशिक्षणाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित 50 व्या तालुकास्तरीय विज्ञान व गणित प्रदर्शन हे तालुक्यातील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनाची चालना देणार असल्याचे मत परळीतील संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांनी व्यक्त केले आहे. चाटे यांनी दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल येथील विज्ञान प्रदर्शनाच्या समारोपात आपले मत व्यक्त केले. 
 
दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल येथे आयोजित केलेले हे विज्ञान प्रदर्शन विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा उषाताई किरण कुमार गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. दिनांक 12 जानेवारी ते 14 जानेवारी दरम्यान गटशिक्षणाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानाने 50 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.या प्रदर्शनाचा समारोप गटशिक्षणाधिकारी नवनाथ सोनवणे व पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांच्या उपस्थितीत झाला.
सविस्तर वृत्त असे की 50 वे तालुकास्तरीय विज्ञान व गणित प्रदर्शन गटशिक्षणाधिकारी कार्यालय परळी वैजनाथ यांच्या संयुक्त विद्यमानाने शहरातील दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल येथे 12 ते 14 जानेवारी दरम्यान संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक विठ्ठलराव तुपे तर प्रमुख पाहुणे म्हणून संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे.जिल्हा परिषद बीडचे अधीक्षक श्री राऊत दादा, परळीचे गटशिक्षणाधिकारी नवनाथ सोनवणे, श्रीमती हिना अन्सारी यांच्या उपस्थितीत समारोप संपन्न झाला.दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल येथे संपन्न झालेल्या विज्ञान प्रदर्शनात 107 प्रयोग दाखवण्यात आले यात प्राथमिक शाळेचे 65 तर माध्यमिक शाळेचे 42 प्रयोग होते. या प्रदर्शनात 175 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता तसेच सदरील विज्ञान प्रदर्शनास 1565 विद्यार्थ्यांनी भेट दिली व विज्ञान प्रदर्शन आणि गणित प्रदर्शन पाहिले.दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल येथे संपन्न झालेल्या प्रदर्शनात यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व कर्मचारी व गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.या विज्ञान प्रदर्शनात परीक्षक म्हणून श्री चव्हाण बी आर,श्री अशोक पवार, श्री धायगुडे महादेव, श्री शालिग्राम घोडके यांनी यशस्वी परीक्षक म्हणून काम पाहिले. तसेच विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा उषाताई किरण गित्ते यांचे या प्रदर्शनात मोलाचे मार्गदर्शन लाभले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार