सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

घराघरात संविधानाची प्रत असावी- मुख्य अभियंता मोहन आव्हाड

यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिकरित्या वाचन करण्यात आले.

Abhimanyu Phad
  • Nov 26 2022 7:26PM
परळी :प्रत्येकाने आपल्या घरात संविधानाची प्रत ठेवावी व संविधानिक मूल्य  समाजामध्ये रुजवावीत असे प्रतिपादन मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी 
परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या प्रशासकीय इमारतीच्या सभागृहामध्ये आयोजित संविधान दिनानिमित्त कार्यक्रमात केले.
     यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिकरित्या वाचन करण्यात आले. भारतीय नागरिकांना आपल्या अधिकार व कर्तव्याची माहिती व्हावी या साठी संविधान दिन शासनाच्या परिपत्रकानुसार साजरा करण्यात येत आहे.
२६ नोव्हेंबर १९४९ ला संविधानाने स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे त्रिकूट तत्त्वांच्या  आधारावर भारतीय समाजाची पुनर्रचना करण्याचे एक प्रभावी साधन  असल्याचे यावेळी मान्यवरांनी आपापल्या मनोगतात  व्यक्त केले . सचिन पवार म्हणाले की, भारतीय संविधानाला सर्वांनी जाती धर्माच्या पलीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे.
कार्यक्रमास उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार , कामगार नेते बी एल वडमारे, सुरक्षा अधिकारी सचिन पवार ,अनिता गवारे मॅडम  यांनी याप्रसंगी संविधान विषयी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक महेंद्र शिंदे  यांनी केले तर सूत्रसंचालन कल्याण अधिकारी दिलीप वंजारी यांनी केले. यावेळी प्रभारी अधीक्षक अभियंता अरविंद येळे, कार्यकारी अभियंता मदन पवार , कार्यकारी अभियंता आर एस कांबळे , भीमराव शिरसाट ,धर्माधिकारी , नंदकिशोर चेन्ने, सुरक्षितता अधिकारी एस बी उदार ,रोहिदास आव्हाड, कल्पना मुंडे , रीमा देशमुख,प्रिया गुनाले, के एच गित्ते मॅडम,मोमीन मॅडम, प्रविण दीक्षित,राजू घुले, वेंकट रामोड, रत्नाकर देवांग,  संदीप बारगजे,निलेश ढवळे,उपस्थितांचे आभार राजू गजले यांनी मानले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार