सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

फुलचंद भाऊ कराड म्हणजे परळी शहराला लाभलेले दुग्ध शर्करा योग : तेजश्री प्रधान

श्री संत भगवान बाबा प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित दुर्गोत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी तेजश्री प्रधान प्रारंभी बोलत होत्या

Abhimanyu Phad
  • Sep 28 2022 12:43PM
परळी :- महाराष्ट्राला मोठे सांस्कृतिक वैभव मिळालेले असून अशा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने अशा संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करीत आमच्या कले सोबत परळीची सांस्कृतिकता जोपासण्याचे काम त्यांनी केले आहे असे मत सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी व्यक्त केले. दरम्यान नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपण हाती घेतलेले हे काम यापुढेही अखंडपणे चालूच राहील असा विश्वास संत भगवान बाबा दुर्गोत्सव समितीचे अध्यक्ष तथा भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी व्यक्त केला.

 श्री संत भगवान बाबा प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित दुर्गोत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी तेजश्री प्रधान व फुलचंद कराड कार्यक्रमाच्या प्रारंभी बोलत होते. प्रारंभी दोघांच्या हस्ते दुर्गा देवीची  पूजा करण्यात आली.
अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मनोरंजनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी अभिनेत्री अर्चना सावंत तसेच भाजपा शहराध्यक्ष जुगल किशोर लोहिया नगरसेवक प्राध्यापक पवन मुंडे, मारोतराव आंधळे, प्रदीप आंधळे, डॉ.रुपाली सोनवणे, पा टलोबा मुंडे, नर्सिंग शिरसाट, देऊ कराड, बाबू राठोड, काशिनाथ राठोड, प्रशांत कराड, यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. 

आपल्या भाषणात अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी चांगले कार्यक्रम आयोजित करत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. दरम्यान फुलचंद कराड हे मुलींच्या शिक्षणाबाबत खूप आग्रही असतात आणि त्यांनी आपल्या सर्व मुलींना शिक्षण दिले हे कौतुकास्पद असल्याचे त्या म्हणाल्या. फुलचंद कराड म्हणजे साखर कारखानदार आणि दुधाचा व्यवसाय करणारे व्यक्तिमत्व आहे अशा व्यक्तिमत्त्वाला आपण जर दुग्ध शर्करा योग असलेले व्यक्तिमत्व म्हटले ते वावगे ठरणार नाही या शब्दात अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी कराड यांच्या सहकार क्षेत्रातील कामाचा गौरव केला.आपल्या भाषणात फुलचंद कराड यांनी सांगितले की मी आहे तेथेच आहे, मला श्री सेवा करायची आहे, आपल्या आशीर्वादत तोपर्यंत असेच कार्यक्रम आयोजित केले जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आज महाराष्ट्राची लोकधारा लावणीचा कार्यक्रम होत असून ही लावणी महाराष्ट्राची कला आहे असे सांगत त्यांनी आज सहभागी झालेल्या कलाकारांना शुभेच्छा दिल्या. राजकारणापेक्षा समाजकारणावर आपला अधिक भर असून यापुढेही तुम्हाला अत्यंत दर्जेदार कार्यक्रम मिळतील असं ते म्हणाले. या नंतर  अर्चना सावंत प्रस्तुत लावणीचा कार्यक्रम पार पडला.या रावजी बसा भाऊजी या गाण्याने तर कहरच केला यासोबतच अनेक लावण्यांनी आजचा कार्यक्रम आणि ढोलकीच्या तालावर उपस्थित असलेल्या प्रेक्षकवर्ग  मंत्रमुग्ध झाला होता.  कैरी पाडाची तसेच प्रसिद्ध असलेल्या अनेक हिंदी गीतांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. नृत्य आणि आवाजातील मंत्रमुग्धता हे आजच्या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणता येईल. पहिल्याच कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला असून यापुढेही रसिकांची मोठी करून होणार हे निश्चित. कार्यक्रमाचे संचालन शिंदे यांनी केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार