सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गीत-संगीत आणि स्नेहभोजनात पार पडला दर्पण दिन;पुरस्कार प्राप्त संपादकांचा सत्कार

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा उपक्रम

Abhimanyu
  • Jan 7 2023 8:58PM

परळी,(प्रतिनिधी):- अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद शाखा परळी च्या वतीने  दि.6 जानेवारी 2023 रोजी दर्पण दिन व मूकनायक दिना निमित्त परळी शहर व तालुक्यातील पत्रकारांचा स्नेह मिलन असा संयुक्त कार्यक्रम संध्याकाळी 7 वा. नवगण महाविद्यालय येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात कै.सुधाकरराव डोईफोडे पत्रकारिता पुरस्कार  मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी व श्रीनाथ मानव सेवा मंडळ यांचा पुरस्कार संपादक सतीश बियाणी तसेच नाशिक  येथील कै. सुंदराबाई आंधळे राज्यस्तरीय पुरस्कार संपादक बालासाहेब फड यांना नुकताच मिळाल्याबद्दल संपादक मंडळींचा सत्कार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद शाखा परळीच्या वतीने करण्यात आला.

दर्पण दिनाच्या निमित्ताने पार पडलेल्या स्नेहमिलन कार्यक्रमास परळी शहराचे विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. यामध्ये प्रामुख्याने परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक  पोलीस निरीक्षक मारोती मुंडे, सराफा असोसिएशनचे नेते सुरेश टाक,ज्येष्ठ संपादक शिवशंकर झाडे, कार्यकारी संपादक प्रशांत जोशी, संपादक राजेश साबणे, संपादक ज्ञानोबा सुरवसे, ज्येष्ठ पत्रकार ओमप्रकाश बुरांडे ,संपादक आत्मलिंग शेटे, संपादक अनंत कुलकर्णी, दैनिक लोकमत टाइम्स प्रतिनिधी राजू कोकलगावे, झुंजार नेता चे पत्रकार प्रकाश चव्हाण, इंजि.भगवान साकसमुद्रे, मनसेचे श्रीकांत पाथरकर, वैजनाथ कळसकर, नवगण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कॅप्टन एम. जि. राजपांगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्व पत्रकार सहपरिवार यांनी एकत्र येऊन आयोजित केलेला कार्यक्रम अतिशय चांगला असल्याचे मत व्यक्त याप्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केले. महाविद्यालयाच्या वतीने सर्व पत्रकारांना यावेळी ग्रंथ भेट म्हणून देण्यात आले. या सर्व कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण गीत आणि संगीताची आतूनही अशी गोडी लावणारा संगीत कार्यक्रम ठरला. डोळ्याने अंध असलेल्या दांपत्याने या कार्यक्रमात मराठी व हिंदी गीतांची अनोखी अशी मेजवानी दिली. अनेक गाणे वन्स मोर झाले होते. गुलाबी थंडीत संगीत शेकोटीत  गाण्याचा आस्वाद असा दुग्ध शर्करा योग्य या कार्यक्रमातून घडून आला होता. परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनी मारोती मुंडे  या कार्यक्रमाला सपत्नीक शेवटपर्यंत हजर होते. सामाजिक कार्यकर्ते चंदुलाल बियाणी यांनीही पत्रकार संघाच्या या कार्यक्रमाचे कौतुक करून आपण नेहमीच वेगळी उपक्रम राबवतात अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
            कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे परळी तालुका समन्वयक धनंजय आरबुने, तालुकाध्यक्ष बालकिशन सोनी, शहराध्यक्ष जगदीश शिंदे, प्रा. प्रवीण फुटके, धीरज जंगले, माणिक कोकाटे, डिजिटल मीडिया परिषदेचे अभिमन्यू फड, श्रीराम लांडगे, गोपाल सोनी,बालाजी ढगे, अमोल सूर्यवंशी, शिवरुद्र कोडे आदींनी परिश्रम घेतले.

@@@@@@@@@@@@@

*दिव्यांग कलाकारांच्या गायनाचा बहारदार कार्यक्रम*

कला शेवटी कलाच असते.ती कशी सादर करायची  हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. परंतु दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही तरीही वाद्य वाजवणे आणि त्याच तालावर गाणे सादर करणे ही बाब निश्चितच छोटी नाही. परळी येथील दिव्यांग असलेल्या दीपिका सावजी आणि तुकाराम जाधव यांनी या कार्यक्रमात अनेक चांगली गीते सादर केली.यात प्रामुख्याने लोकगीते, भावगीते, भक्ती गीते, गवळण,भारुड, देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली. त्यांना या कार्यक्रमास साथ देण्यासाठी कृष्णा शिंगारे परभणी तर तबल्यावर रवी गंगणे लातूरहून या कार्यक्रमासाठी आले होते.सहगायक म्हणून सुवर्णा जंगले, प्रतीक्षा कस्तुरे, डॉ. बजाज यांनी मोलाची साथ दिली.

@@@@@@@@

*नवगण महाविद्यालयाच्या संगीत विभागाचाही सहभाग*

नवगण महाविद्यालयात अध्यापनाचे काम करीत असताना गीत संगीताची आवड मनापासून जोपासणारे प्रा.संजय वडगावकर आणि प्राध्यापक राहुल राहुल सोनवणे, मिलिंद सोनकांबळे यांनीही पत्रकारांच्या स्नेहमिलन कार्यक्रमात गायनाची चांगलीच रंगत आणली होती. स्वतःहून पुढाकार घेत त्यांनी या कार्यक्रमात उस्फूर्तपणे सहभाग घेतला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार