सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लिंग विनिश्चित वीर्य मात्रा :- पशु पालकांसाठी नवी संजीवनी व 90 टक्के उच्च वंशावळीच्या मादीची निर्मिती

पालघर - राज्यातील गायी व म्हशी मधील दुध उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीकोनातून गायी व म्हशींमध्ये कृत्रिम रेतन कार्यक्रमासाठी लिंग विनिश्चित वीर्य मात्रा वापर करून उच्च अनुवंशिकते च्या कालवडी / पारड्या ची निर्मिती करण्यात येणार आहे.

Sudarshan MH
  • Jun 15 2021 7:39PM


पालघर - राज्यातील गायी व म्हशी मधील दुध उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीकोनातून गायी व म्हशींमध्ये कृत्रिम रेतन कार्यक्रमासाठी लिंग विनिश्चित वीर्य मात्रा वापर करून उच्च अनुवंशिकते च्या कालवडी / पारड्या ची निर्मिती करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यात 90% उच्च वंशावळीची मादी वासरांची निर्मिती होणार आहे. सदर वीर्य मात्रा ह्या पशु पालकांना केवळ 81 रुपयांना उपलब्ध होणार आहे. असे महाराष्ट्र राज्याचे पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री श्री सुनील केदार यांनी लिंग विनिश्चित वीर्य मात्रा उत्पादन व पुरवठा कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले.
जिल्ह्यातील प्रत्येक पशुवैद्यकीय संस्था, फिरते पशु चिकित्सालया द्वारे व जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र पालघर या कार्यालयामार्फत सदर वीर्य मात्रा ह्या पशु पालकांना मागणी नुसार व त्यांच्या कडील उपलब्ध असणाऱ्या जातनिहाय गायी व म्हशींप्रमाणे पुरविण्यात येणार आहेत. कृत्रिम रेतनाद्वारे जन्मास येणाऱ्या अतिरिक्त नर वासरांचे संगोपन करण्यासाठी पशु पालकांना अनावश्यक खर्चाचा भार सहन करावा लागत होता. परंतु या तंत्रज्ञाना मुळे आता सदर भार हा कमी होणार आहे. पारंपारिक वीर्य मात्रांच्या वापरा ऐवजी जर ह्या अत्याधुनिक तंत्रज्ञाना चा वापर करून वीर्य मात्रांचा क्षेत्रीय स्तरावर गायी व म्हशीमध्ये वापर केल्यास 90 % मादी वासरांची निर्मिती करणे शक्य होईल.
ज्या शेतकऱ्यांच्या गायी व म्हशी मध्ये लिंग विनिश्चित वीर्य मात्रा वापरून कृत्रिम रेतन केले आहे अश्या शेतकऱ्यास रु. 40/- अधिक कृत्रिम रेतानासाठी शासनास देय असलेले सेवाशुल्क रु. 49/- असे फक्त रु. 81/- च अदा करावे लागणार आहे.
सदर तंत्रज्ञानामुळे उच्च वंशावळीच्या कालवडीची निर्मिती होणार असल्याने भविष्यात निश्चितच दुध उत्पादन वाढेल व जिल्ह्यातील आदिवासी पशु पालकांना या मार्फत रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त पालघर डॉ. प्रशांत ध. कांबळे यांनी केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार