सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्थ म्हणजे भारताची अर्थव्यवस्था*

आशियातील आघाडीची तिसरी मोठी भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील सर्वाधिक खुली अर्थव्यवस्था आहे. ही अर्थव्यवस्था व्यवसायांसाठी अत्यंत पूरक आणि स्पर्धात्मक वातावरण प्रदान करते.

Snehal Joshi
  • Jul 10 2020 10:44PM
आशियातील आघाडीची तिसरी मोठी भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील सर्वाधिक खुली अर्थव्यवस्था आहे. ही अर्थव्यवस्था व्यवसायांसाठी अत्यंत पूरक आणि स्पर्धात्मक वातावरण प्रदान करते. जगभरातील व्यावसायिकांना येथे मोठ्या प्रमाणात संधी आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  गुरुवारी केले. ते इंडिया ग्लोबल वीक-2020 मध्ये बोलत होते.
कोरोनामुळे कराव्या लागलेल्या लॉकडाऊनमधून भारत आता बाहेर पडत आहे. अर्थव्यवस्था आता रुळावर येण्याचे संकेत दिसत आहेत. जगातील सर्वाधिक खुल्या अर्थव्यवस्थांपैकी भारतीय अर्थव्यवस्था एक आहे. जागतिक कंपन्यांसाठी आम्ही लाल गालिचा अंथरत आहोत. त्यांनी भारतात येऊन व्यवसाय करावा. भारत देत असलेल्या संधी जगातील निवडक देशच उपलब्ध करतात, असे त्यांनी सांगितले.
 अधिक उत्पादक, गुंतवणूक पूरक आणि स्पर्धात्मक अर्थव्यवस्था आम्ही उभारत आहोत. भारतातील विविध उगवत्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची शक्यता आणि संधी आम्ही उपलब्ध करून देत आहोत. कृषी क्षेत्रात केलेल्या सुधारणांमुळे साठवणूक आणि वाहतूक सेवेत गुंतवणुकीच्या आकर्षक संधी निर्माण झाल्या आहेत. गुंतवणूकदारांसाठी आम्ही दरवाजे उघडे केले असून, येथे थेट गुंतवणूक करा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी जागतिक गुंतवणूकदारांना केले.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातही भारताने मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या. त्यामुळे हे क्षेत्र मोठ्या उद्योगांसाठी पूरक ठरणार आहे. भारताच्या संरक्षण क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली, असे त्यांनी संरक्षण उत्पादनातील काही उपकरणांच्या निर्मितीची संधी खाजगी क्षेत्रांना उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगताना स्पष्ट केले.
  खाजगी गुंतवणूकदारांना अंतराळ क्षेत्रातही गुंतवणुकीची संधी देण्यात आली. नागरिकांच्या हितासाठी खाजगी अंतराळ तंत्रज्ञानाता वापर व्यावसायिक पातळीवर अधिकाधिक करता येईल. कोरोना महामारीनंतर जगभरात सावरणार्या जागतिक अर्थव्यवस्थांसोबत निगडित असलेली भारताची अर्थव्यवस्था देखील आता वेग धरत आहे, असेही त्यांनी सांगितले.
कोरोना काळात देशातील गरीब नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने स्वयंपाकाचा गॅस, मोफत रेशन आणि रोख उलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले. या संकटकाळात आम्ही नागरिकांना दिलासा देऊन मोठ्या सुधारणा राबवल्या, असेही त्यांनी सांगितले.
सामाजिक असो अथवा आर्थिक, प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याचे सामर्थ्य भारताने दाखवले आहे. मागील सहा वर्षांत वित्तीय समावेशन, गृह आणि पायाभूत विकास, व्यवसाय सुलभता आणि जीएसटीसारखी धाडसी करसुधारणा आम्ही केली. जागतिक अर्थव्यवस्थेच्या भरभराटीसाठी जे करणे शक्य आहे, ते भारत करेल. आता हा असा भारत आहे, जो सुधारत आहे, बदलत आहे आणि मोठी कामगिरी करीत आहे, असे त्यांनी सांगितले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार