सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पालघर शहरातील जवळ 66 हजार लिटर डिझेल विना परवाना साठवणूक केलेल्या राजकीय नेत्यांवर गुन्हा दाखल होणार का?

पालघर - पालघर चिंतूपाडा येथील माजी उप नगराध्यक्ष यांच्या मालकीच्या कंपनीतून 66 हजार लिटर डिझेल मिश्रित ऑइल जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी पंचनामा करून ताब्यात घेत कंपनी सील केली आहे.

Sudarshan MH
  • Jun 10 2021 4:48PM

पालघर - पालघर चिंतूपाडा येथील माजी उप नगराध्यक्ष यांच्या मालकीच्या कंपनीतून 66 हजार लिटर डिझेल मिश्रित ऑइल जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी पंचनामा करून ताब्यात घेत कंपनी सील केली आहे.या कंपनीत गेल कन्स्ट्रक्शन यांच्या जहाजातून काढलेला ऑइल विनापरवानगी त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं रात्री उशिरा जिल्हाधिकारी यांना प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर बुधवारी दुपारी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी पंचनामा करत ही कंपनी सील केली आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पालघर शहराच्या जवळ चींतु पाडा औद्योगिक वसाहतीत पालघरचे माजी  उपनगराध्यक्ष यांच्या मालकीच्या कंपनीत कुठलीही परवानगी न घेता डिझेल सदृश्य केमिकल असल्याची माहिती समोर आल्यानंतर अगोदर जिल्हाधिकारी यांच्या परवानगीनेच येथे हे सामान ठेवला असल्याची माहिती उपनगराध्यक्ष यांनी दिली होती परंतु अधिक चौकशी करता कुठलीही परवानगी घेतली नसल्याची बाब उघड आल्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच पालघर तहसीलदार यांनी स्वतः या कंपनीत भेट देत ही कंपनी सील करत पुढील कारवाईसाठी कंपनी सिल केली आहे बोईसर येथील स्थानिक गुन्हे शाखा उपनिरीक्षक आशिष पाटील यांनी देखील घटनास्थळी येत त्या ठिकाणची परिस्थिती बघून उपस्थित यांवर ती गुन्हे दाखल करण्यासाठी पुढील प्रक्रिया सुरू केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे संध्याकाळी उशिरापर्यंत गुन्हे दाखल होत असल्याची माहिती समोर आली असून जिल्हा प्रशासन अशा विनापरवानगी स्फोटक साठवणूक करणाऱ्या बड्या राजकीय व्यक्ती वरती गुन्हा दाखल करणार का हा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार