सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

प्रसार माध्यमांवर देवी-देवतांच्या नावाने यंत्र तंत्र विक्री जाहिरात दाखविण्यावर बंदी

प्रसार माध्यमांवर धर्माच्या नावाने भीती दाखवून विविध देवी- देवतांचे यंत्र आदी वस्तू घेऊन भरभराटी होईल, अशा जाहिराती दाखवल्या जातात. अशा जाहिरातीतून नागरिकांची फसवणूक होते असते. राज्य शासनाच्या २०१३ मधील अघोरी कृत्य व काळी जादू कायद्यानुसार प्रसार माध्यमांवर जाहिरात प्रक्षेपण करता येत नाही.

Snehal Joshi .
  • Jan 7 2021 10:20PM
प्रसार माध्यमांवर देवी-देवतांच्या नावाने यंत्र तंत्र विक्री जाहिरात दाखविण्यावर बंदी घालण्याचे आदेश प्रसार माध्यमांवर देवी- देवतांच्या नावाने यंत्र,तंत्र विक्री करण्याबाबत जाहिरात दाखविण्यावर बंदी घालण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाचे न्या.टी.व्ही.नलावडे व न्या.एम.जी. शेवलीकर यांनी दिले.अशा प्रकारच्या यंत्राची विक्री, उत्पादन, प्रसार व प्रसार करणाऱ्यांवर अघोरी कृत्य आणि काळी जादू कायदा २०१३ नुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत. केंद्र व राज्याने 30 दिवसांत अशा प्रकारांवर कारवाई करण्यासाठी काय पावले उचलली. यासंबंधी संभाजीनगर खंडपीठाला अवगत करावे, असेही या आदेशात नमूद केले आहे.  प्रसार माध्यमांवर धर्माच्या नावाने भीती दाखवून विविध देवी- देवतांचे यंत्र आदी वस्तू घेऊन भरभराटी होईल, अशा जाहिराती दाखवल्या जातात. अशा जाहिरातीतून नागरिकांची फसवणूक होते असते. राज्य शासनाच्या २०१३ मधील अघोरी कृत्य व काळी जादू कायद्यानुसार प्रसार माध्यमांवर जाहिरात प्रक्षेपण करता येत नाही. तरी देखील प्रसारमध्यमात बिनदिक्कत जाहिराती दाखविल्या जातात. याविरुद्ध २०१५ मध्ये संभाजीनगर येथील सिडको भागातील रहिवासी राजेंद्र गणपतराव अंभोरे यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. प्रत्येक पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षकांच्या समवेत अशा अंधश्रद्धा पसरविणाऱ्या जाहिरातींवर प्रतिबंध घालावा. कायद्याच्या माध्यमातून भोदूगिरीला वेसण घालावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. याचिकाकर्ते अंभोरे यांनी मात्र, नंतर याचिका मागे घेण्याची खंडपीठाकडे विनंती केली होती. परंतू, खंडपीठाने याचिका समाजासाठी महत्त्वाची असल्याने पुढे चालू ठेवून, न्यायालयाचे मित्र म्हणून बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ विजयकुमार सपकाळ यांची नियुक्ती केली. राज्य  शासनाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील महेंद्र नेर्लीकर यांनी तर केंद्राच्या वतीने डी. जी. नागोडे यांनी काम पाहिले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार