सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबारला दिवसाकाठी होतोय एक मृत्यू; जिल्हाधिकारी यांनी प्रतिबंधाचे कडक आदेश

जिल्हाधिकारी यांनी प्रतिबंधाचे कडक आदेश

Nandurbar. MH
  • Feb 18 2021 8:21PM
नंदुरबार : कोरोनाने बाधीत झालेले रुग्ण सरासरी दिवसाला एक मृत्यू पावत असतानाही लोकांनी निर्धास्तपणे गर्दीतील ऊठ-बस चालू ठेवली आहे. तथापि, कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी सर्व वरीष्ठ अधिकाऱ्यांना आज दिले.
   नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयात मागील 45 दिवसात कोरोनाने बाधीत झालेल्या 47 रुग्णांचा मृत्यू झाला. सरासरी चोवीस तासाला एक मृत्यू असे हे प्रमाण असून नंदुरबार जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढल्याचे निदेशक आहे. 4 जानेवारी 2019 रोजी पर्यंत कोरोना बाधितांची मृत्यू संख्या 170 वर स्थिरावलेली होती. एकाच दिवशी दोन मृत्यू झाल्याने 5 जानेवारीला ही संख्या 172 झाली. नंतर रोज एक मृत्यू होत राहिला. 17 फेब्रुवारी 2021 रोजी सायंकाळच्या अहवालानुसार मरण पावलेल्या कोरोना बाधितांची एकूण संख्या 217 झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 81 मृत्यू शहादा तालुक्यात झालेत. 1 वर्षापूर्वी कोरोना स्थिती उद्भवल्या पासून आतापर्यंत अक्कलकुवा आणि धडगाव हेे दुर्गम तालुके सुरक्षित राहिले असून दोन्ही तालुक्यात प्रत्येकी केवळ 4 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
 दरम्यान, कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून वेळोवेळी देण्यात आलेले निर्देश, नियमावली, कार्यप्रणाली आलेले आदेश लागू राहतील. कोणत्याही व्यक्ती, समूह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथ प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973, भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदी नुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमुद करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी आदेशात असेही म्हटले आहे की सर्व उपविभागीय अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकीत्सक, कार्यकारी अभियंता,जिल्हा आरोग्य अधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक यांनी कोविड रुग्णालय आणि कोविड केअर सेंटर इमारतीची तपासणी करुन त्यामध्ये रुग्णांसाठी आवश्यक साहित्य हे कुठल्याही क्षणी वापरता येतील अशा स्थितीत आणून ठेवण्याबाबत कार्यवाही करावी.
बाधीत रुग्णांना विषाणूचा संसर्ग कुठून झाला याबाबत ठिकाणाचा, कार्यक्रमाचा शोध घेवून त्या ठिकाणी उपस्थित व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करावी.
सर्व तहसिलदार, मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी एखाद्या परिसरात कोविड बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या परिसरातील व्यक्तींच्या हालचालींवर निर्बंध लागू करण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या धोरणानुसार प्रतिबंधीत क्षेत्र तयार करावे.अशा ठिकाणी मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी. पोलीस विभाग, घटना व्यवस्थापक, उपविभागीय दंडाधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांनी लग्न समारंभ, अंत्यविधी व इतर मोठ्या प्रामाणात गर्दी होणारे कार्यक्रमांना नियंत्रित करावे. लग्न समारंभात एकावेळी 50 पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. लग्न समारंभासाठी स्थानिक पोलीस स्टेशन व स्थानिक स्वराज्य संस्थाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक राहील. मंगल कार्यालय, लॉन्स, हॉलच्या ठिकाणी मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्ती व 50 पेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्यास नियमानुसार कारवाई करावी. पोलीस विभाग, मुख्याधिकारी ,राज्य उत्पादन शुल्क, अन्न प्रशासन विभाग यांनी उपहारगृहे, रेस्टॉरंट, बार, इत्यादी आदरातिथ्य सेवा 50 टक्के क्षमतेसह सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सुरु राहतील यांची खातरजमा करावी.
 कुलसचिव, कॉलेजचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी (माध्यमिक ) यांनी सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मास्कचा वापर करतात का हे तपासावे. प्रत्येक वर्गात सॅनिटायझर अथवा हात धुण्यासाठी साबण उपलब्ध ठेवण्याबाबत आवश्यक कार्यवाही करारवी. तसेच संशयीत विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर चाचणी करुन घ्यावीत.
 पोलीस विभाग, मुख्याधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती भाजीपाला मार्केट, शॉपींग कॉम्प्लेक्स , मॉल याठिकाणी सर्व दुकानदार, त्याचे कर्मचारी, विक्रेते यांना मास्क लावणे बंधनकारक करावे. तसेच प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर उपलब्ध राहील व एकाचवेळी केवळ 5 ग्राहकच उपस्थित राहतील याबाबत कार्यवाही करावी. सर्व कार्यालय प्रमुखांनी शासकीय कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मास्क लावणे बंधनकारक करावे. सॅनिटायझर वापर ,हात धुण्यासाठी साबण तसेच कर्मचाऱ्याने मास्क वापरणे तसेच दुपारचे जेवण एकत्रित करणे याबाबत कर्मचाऱ्यांना अवगत करावे.
 पोलीस विभाग, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, आगार व्यवस्थापक, रेल्वे स्टेशन व्यवस्थापकांनी रेल्वे, एस.टी. बसेस, ट्रॅव्हल्स, रिक्षा, कॅब, कालीपीली यांना अनुज्ञेय क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवण्याबाबत बंदी करावी. जास्त प्रवासी बसल्यास दंडात्मक कार्यवाही करावी. मुख्याधिकारी नगर पालिका, नगर पंचायत यांनी सार्वजनिक उद्याने फक्त सकाळी 5 ते 9 यादरम्यान व्यायाम, मॉर्निंग वॉक करणाऱ्यांसाठीच खुले ठेवावेत, परंतु सदरच्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. 
मुख्याधिकारी ,करमणूक कर निरीक्षक, संबंधित व्यवस्थापकांनी सिनेमागृहामधील सर्व प्रेक्षक, कर्मचारी यांना मास्कचा वापर करण्याबाबत सुचना द्याव्यात. मुख्याधिकारी ,आगार व्यवस्थापक, रेल्वे स्टेशन व्यवस्थापकाने बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, सार्वजनिक प्रसाधन गृहे व इतर ठिकाणच्या आपल्या कार्यक्षेत्रात वेळोवेळी निर्जंतूकीकरण करावे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार