सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बस - ट्रकच्या भिषण अपघातात महिला ठार, २९ जखमी

निजामपूर - नाशिक-नंदुरबार बस व मालट्रकमध्ये झालेल्या भिषण अपघातात महिला ठार तर २९ जण गंभीर जखमी

Nandurbar MH
  • Dec 10 2020 12:01PM

 सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

निजामपूर - नाशिक-नंदुरबार बस व मालट्रकमध्ये झालेल्या भिषण अपघातात महिला ठार तर २९ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. अपघातात मरण पावलेली महिला घोटाणे येथिल रहिवासी असल्याने गावावर शोककळा पसरली आहे. 
सर्विस्तर वृत्त असे कि, काळ सकाळी ११ वाजेच्या सुमारास नाशिक-नंदुरबार बस (क्र. एम एच १४ बी टी ३७५२) हि निजामपूरहून नंदुरबारकडे प्रवासी घेऊन जात असतांना नंदुरबारहून साक्रीकडे भरदाव वेगात येणाऱ्या मालट्रकने जबर धडक दिली. मालट्रकची धडक इतकी भयानक होती कि बस व ट्रकचा पुढील भाग चक्काचूर झाला होता अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपाचारासाठी निजामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले तर गंभीर जखमी असलेल्या काहींना धुळे व नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले या भीषण अपघातामुळे निजामपूर-नंदुरबार रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला होता निजामपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाठ तात्काळ आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले बसमध्ये अडकलेल्या बसचालकाला जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढावे लागले सायंकाळ पर्यंत अपघातग्रस्त मालट्रक व बस क्रेनच्या साह्याने रस्त्याच्या बाजूला करण्यात आल्याने वाहतूक सुरळीत झाली होती

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार