सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

काटोलचा सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकास करणार : ना. गडकरी

काटोलचा सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकास करणार : ना. गडकरी -न.प.च्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण -प्रत्येक गावात खेळाचे मैदान तयार करा -जिल्ह्यात सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव करा -सांडपाण्यापासून ग्रीन हायड्रोजन तयार करा -नागपूर काटोल रस्त्यातील अडचणी दूर करणार

Snehal Joshi .
  • Jan 2 2022 9:16PM

काटोल हे नागपूरशेजारी असलेले मोठे शहर आहे. या शहराचाही सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकास साधण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. तसेच तरुणांच्या हाताला काम, यासोबतच शेतकर्‍याचाही विकास झाला पाहिजे, यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.

 
काटोल नगर परिषदेच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आज ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी काटोलचे भाजपा नेते व कृषी सभापती चरणसिंग ठाकूर, खा. कृपाल तुमाने, आ. आशिष जयस्वाल, माजी आ. गिरीश व्यास, सुधाकर कोहळे, अरविंद गजभिये, उकेश चव्हाण व अन्य उपस्थित होते.

 
आज उद्घाटन झालेल्या पोहण्याचा तलाव हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा असला पाहिजे असे मला वाटत होते. त्याच पध्दतीचा हा तलाव झाला आहे. आता या तलावात प्रशिक्षित होणारे मुलेमुली राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर जातील. तसेच शहरात दोन ठिकाणी मोठी मल्टीप्लेक्स थिएटर शहरात असावी. सकाळच्या वेळी या थिएटरमध्ये राष्ट्रीय महापुरुषांचे चित्रपट विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी दाखविण्यात यावे. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक गावात खेळाची मैदाने तयार केली पाहिजेत, असेही ना. गडकरी म्हणाले.

 
जिल्ह्याच्या सामाजिक व सांस्कृतिक विकासासाठी जिल्ह्यात सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात यावे. त्यासाठी मी मदत करण्यात तयार असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- शेतकर्‍याच्या विकासासाठी ड्रायपोर्ट सिंदी येथे साकारत आहे. येथून शेतकर्‍याला माल आयात निर्यात करता येणार आहे. आपल्या भागाचा सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकास झाला पाहिजे. तसेच शेतकर्‍याचा विकासही झाला पाहिजे यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहे. काटोल ही नागपूरची सॅटेलाईट सिटी होईल. विजेची समस्या लक्षात घेता भारनियमन होईल. त्यामुळे काटोलात इमारतींवर सोलर पॅनेलद्वारे सौर ऊर्जा निर्मिती व्हावी. सांडपाण्यापासून हायड्रोजन निर्मितीचा प्रकल्पही व्हावा. कारण आता गाड्या हायड्रोजनवरच चालणार आहे, असेही ते म्हणाले.

 
नागपूर काटोल रस्त्याचेही आज भूमिपूजन झाले. या रस्त्यात येणार्‍या सर्व अडचणी दूर करून हा रस्ता पूर्ण करू. या रस्त्यावर दोन-तीन ठिकाणी उड्डाणपूल होतील. फेटरीजवळ रिंगरोड होईल. मोवाड ते मध्यप्रदेश सीमेपर्यंत रस्ताही लवकरच सुरु होईल. तसेच ब्रॉडगेज मेट्रोने काटोल, नरखेड, रामटेक, वर्धा, यवतमाळ, अमरावती, गोंदिया, चंद्रपूर हे जोडले जाणार असल्याचेही ना. गडकरी यावेळी म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार