सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दिव्यांगांसाठीची राष्ट्रीय वयोश्री योजना तसेच दिव्यांग सहायता योजना - केंद्र सरकारचा उपक्रम

भारत सरकारने राष्ट्रीय वयोश्री योजना-२०२१ व दिव्यांग सहायता योजनेची सुरवात केली असून नागपूर शहर तसेच जिल्ह्यातील किमान पंचेचाळीस ते पन्नास लाख लोकांना या योजनांचा लाभ मिळू शकेल,अशी माहिती केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

Snehal Joshi .
  • Feb 25 2022 11:37PM

भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाने नागपूर शहर व जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांगांसाठीची राष्ट्रीय वयोश्री योजना तसेच दिव्यांग सहायता योजना(अ डिप असिस्टन्स टू डिसेबल्ड पर्सन्स) या योजनांची घोषणा केली आहे.आपल्या समाजाचा महत्वाचा घटक असेलेले ज्येष्ठ नागरिक तसेच कोणत्याही प्रकारचे अपंगत्व वाट्यााला आलेल्या दिव्यांगांना मदत करण्यासाठी भारत सरकारने राष्ट्रीय वयोश्री योजना-२०२१ व दिव्यांग सहायता योजनेची सुरवात केली असून नागपूर शहर तसेच जिल्ह्यातील किमान पंचेचाळीस ते पन्नास लाख लोकांना या योजनांचा लाभ मिळू शकेल,अशी माहिती केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्र परिषदेत दिली.

योजना कितीही चांगली असली तरी लोकप्रतिनिधी व प्रशासनातील लोकांनी पुढाकार व स्वारस्य घेतल्याशिवाय योजना यशस्वी होऊ शकत नाही त्यामुळे लोकप्रतिनिधी व प्रशासकीय आधिका-यांनी या योजनांचे क्रियान्वल एक अभियान म्हणून राबवावे अशी सूचना याप्रसंगी गडकरी यांनी केली. या योजनेचा लाभ बीपीएल व एपीएल वर्गातील आर्थिकदृष्टया कमकुवत असलेल्या दिव्यांग तसेच वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मिळणार असून या योजनेतंर्गत ज्येष्ठांना तसेच दिव्यांगांना व्हीलचेअर,तीन चाकी,ब्रेल स्लेट,कॅलिपर्स,वॉकिंग स्टिक्स,एल्बो क्रचेस,ट्रायपॉडस,टेट्रापॉडस,श्रवणयंते,कृत्रिम डेंचर्स,चष्मे,सर्व्हायकल कॉलर अशा ५० प्रकारच्या उपकरणांचा,यंत्राचा व वस्तूंचा मोफत लाभ योजनेतील पात्र लाथार्थ्यांना होणार आहे.

आपल्या लोकसंख्येतील अंदाजे १० टक्के लोक हे ज्येष्ठ नागरिक असतात.नागपूर शहर व जिल्ह्यातील १४ तालुके मिळून ही संख्या किमान ८ ते १० लाख असावी.यातील काही नागरिक हे दिव्यांग असतात तसेच काहींना वयोमर्यादेनुसार कुठल्या तरी प्रकारची निर्बलता किंवा अपंगत्व येत असतं.त्यांना अशा उपकरणाची गरज असते,अशी उपकरणे गरजूंना देता यावीत यासाठी ज्येष्ठांची,दिव्यांगांची पात्रतेनुसार निवड करणे,त्यांच्या गरजा निर्धारित करणे आणि नंतर त्यांची पूर्तता करणे अशी प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी सरपंच ते खासदार अशा सर्व लोकप्रतिनिधींचे तसेच ग्रामीण पातळीवर तलाठी ते जिल्हाधिकारी अशा सर्व प्रशासकीय अधिका-यांचे सहाकार्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय वयोश्री योजना व दिव्यांग सहायता योजनेच्या भावी लाथार्थ्यांसाठी नोंदणी व मूल्यांकन शिबिरे तसेच उपकरण वितरण शिबिरे,नागपूर तसेच नागपूर जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरावर आयोजित केली जातील,अशी माहिती त्यांनी दिली.या शिबिरांचे आयोजन व शिबिरांना ज्येष्ठ तसेच दिव्यांगाचा उत्तम प्रतिसाद मिळण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिका-यांनी भरीव योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार