सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुंबई लोकलसाठी मनसे आक्रमक, थेट हायकोर्टात हस्तक्षेप याचिका

मुंबई लोकल प्रवासाबाबत मनसेने उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. बार कौन्सिलने यापूर्वीच याचिका दाखल करुन, दोन लस घेतलेल्या वकिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्याची मागणी केली आहे.

Sudarshan MH
  • Aug 5 2021 1:33PM
मुंबई : मुंबई लोकल प्रवासाबाबत मनसेने उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. बार कौन्सिलने यापूर्वीच याचिका दाखल करुन, दोन लस घेतलेल्या वकिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्याची मागणी केली आहे. त्यातच आता मनसेने हस्तक्षेप याचिका दाखल करुन सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासाची लावून धरली आहे.

मनसेने आपल्या याचिकेत दोन लस घेतलेल्या सर्वांनाच लोकल प्रवासाची मुभा देण्याची मागणी केली आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी याबाबतची माहिती दिली. यावर आता कोर्ट काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.

कोरोना रुग्ण संख्येत घट झाल्याने राज्य सरकारने महाराष्ट्रातील निर्बंध शिथील केले आहेत. राज्य सरकारने 22 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील केले आहेत, तर 11 जिल्ह्यांतील निर्बंध नियम जैसे थे ठेवले आहेत. मात्र मुंबई लोकलबाबत काहीही निर्णय घेतलेला नाही.

अशा परिस्थितीत मनसेने सातत्याने दोन डोस घेतलेल्या सामान्य नागरिकांनाही मुंबई लोकलमधून प्रवास करु देण्याची मागणी केली होती.

संदीप देशपांडेंचं मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र 

सर्व जणांच्या पाठीवर आपण “शिव पंख” लावून दिलेत, तर त्यांना कामावरही जाता येईल आणि त्रास पण नाही, असा टोला मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी लगावला. मुंबई लोकलमधून प्रवास करण्यास सर्वसामान्य जनतेला अद्यापही परवानगी न दिल्यावरुन देशपांडेंनी ठाकरे सरकारला ट्विटरवरुन चिमटे काढले.

मनसेचा रेलभरो आंदोलनाचा इशारा

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मुंबईत लोकलने प्रवास करण्याची परवानगी मिळावी, म्हणून मनसे आक्रमक झाली आहे. गेल्याच आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना याविषयी पत्र लिहिलं होतं. त्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन राज्य सरकारला इशारा दिला. ज्यांनी लसीचे 2 डोस घेतलेत त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, नाहीतर मनसेला रेलभरो करावं लागेल, असं त्यांनी म्हटलं होतं.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार