सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मालिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा आझाद मैदानावर धडक मोर्चा, भाजप नेते पोलिसांच्या ताब्यात*

भाजप ची राजकीय मागणी नाही.नवाब मलिकांचा राजीनामा न घेणे हि राज्याला लाज आणणारी घटना-- देवेंद्र फडणवीस

Snehal Joshi .
  • Mar 9 2022 9:33PM

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने काढलेला मोर्चा आझाद मैदानापासून  सुरू झालेला मोर्चा अंतरावर  मेट्रो सिनेमाजवळ अवडण्याता आलं आहे. शेकडोच्या संख्येने पोलिसांनी या मोर्चेकऱ्यांना अडवलं आणि त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. मात्र, मोर्चेकऱ्यांनी विधानभवनावर धडकण्याचा अट्टाहास धरल्यानंतर पोलिसांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, नितेश राणे, प्रसाद लाड, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना घटनास्थळावरून निघून जाण्याचं आव्हान केलं . मात्र, मोर्चेकरी अजूनही घटनास्थळी अजूनही आंदोलन करताना दिसत होते . त्यामुळे पोलिसांनी मोर्चाच्या परिसरात बॅरिकेड्स लावून मोर्चेकऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न सुरू केला . तर पोलिसांना सहकार्य करा, त्यांच्याशी हुज्जत घालू नका, असं आवाहन फडणवीस यांनी मोर्चेकऱ्यांना केलं होत. 

नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप यांनी आज मोर्च्याची हाक दिली होती. त्यामुळे राज्यभरातून भाजपचे हजारो कार्यकर्ते आझाद मैदानात आले होते. यावेळी झालेल्या सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी संबोधित केलं. फडणवीस यांचं भाषण झाल्यानंतर आझाद मैदानातून हा मोर्चा विधानभवनाच्या दिशेने निघाला. मात्र, मेट्रो सिनेमाजवळ मोर्चा येताच पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना अडवलं. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून मोर्चेकऱ्यांना अडवण्यात आल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी जोरजोरात घोषणाबाजी  केली .

मात्र, मोर्चा सुरू होण्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस जिथे अडवतील तिथे पोलिसांना सहकार्य करा असं आवाहन केलं होतं. त्यानुसार पोलिसांनी मेट्रो सिनेमा परिसरात मोर्चा अडवताच पोलिसांनी फडणवीसांना ताब्यात घेतलं. फडणवीस यांनीही अटक करून घेतली. त्यानंतर चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड,  चंद्रशेखर बावनकुळे  आणि नितेश राणे आदी नेत्यांनीही अटक करवून घेतली. त्यानंतर पोलिसांची व्हॅन त्यांना घेऊन गेली.

पोलिसांची व्हॅन गेल्यानंतरही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली होती. पोलिसांनी या सर्वांना घरी निघून जाण्याचं आवाहन वारंवार मेगाफोनवरून केलं. त्यानंतर काही काळ घोषणाबाजी केल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते पांगले.

मोर्चा सुरु होण्यापूर्वी फडणवीसांनी तडाखेबाज  भाषण झालं . त्यांनी आपल्या भाषणातून राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. बॉम्बस्फोटाच्या आरोपींसोबत व्यवहार करून जमीन घेणाऱ्या नवाब मलिकांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. ही काही आमची राजकीय मागणी नाही. राजकारणासाठी आम्ही बोलत नाही. रोज घटना घडतात. आम्ही रोज राजीनामा मागत नाही. ही घटना बघितली तर राज्याला लाज आणणारी आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

बाळासाहेबांना उत्तर देण्याची वेळ आली तर आम्ही सांगू की आम्ही संघर्ष केला. पण सत्ताअंध झालेल्या मुख्यमंत्र्यांच काय ते  बाळासाहेबांना काय उत्तर देते? असा सवालही त्यांनी केला. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार