सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

साहसी क्रीडा पर्यटन उपक्रमासाठी नोंदणी बंधनकारक; संस्था व व्यक्तींनी ऑनलाईन नोंदणी करावी

नोंदणी न करता साहसी उपक्रमांचे आयोजन केल्यास 25 हजार रूपये दंड, साहित्य जप्ती व आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात येईल.असे स्पष्ट करण्यात आले.

Deepak Chavhan
  • Oct 10 2022 7:44PM
नाशिक - गिर्यारोहण, रॉक क्लाइंबिंग, रॅपलिंग, पॅराग्लायडिंग, बोटिंग इत्यादी विविध प्रकारचे साहसी पर्यटन उपक्रमांसाठी नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्याअनुषंगाने नाशिक विभागातील साहसी उपक्रम आयोजित करणाऱ्या संस्था अथवा व्यक्तींनी पर्यटन संचालनालयाच्या विभागीय कार्यालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी असे, पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई-राठोड यांनी कळविले आहे.

साहसी क्रीडा पर्यटनात विविध प्रकारचे साहसी पर्यटन उपक्रम राबविण्यात येतात. अशावेळी योग्य ती खबरदारी घेणे व तज्ज्ञ प्रशिक्षक असणे गरजेचे असते. उपक्रम आयोजित करतेवेळी पुरेशा सुरक्षेच्या उपाययोजना व त्याची खातरजमा करणे आवश्यक असून यासाठी पर्यटन संचालनालयाने नोंदणी करणे बंधनकारक केले आहे.  नाशिक विभागातील नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव व नंदूरबार या जिल्ह्यामधील साहसी उपक्रम आयोजित करणाऱ्या संस्था व व्यक्तींनी www.maharashtratourism.gov.in पर्यटन संचालनालय नाशिक विभागाच्या या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी. प्रति साहसी प्रकार 500 रूपये शुल्क असून अर्ज सादर केल्यानंतर नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. नोंदणी न करता साहसी उपक्रमांचे आयोजन केल्यास 25 हजार रूपये दंड, साहित्य जप्ती व आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात येईल.
 

अधिक माहितीसाठी उपसंचालक कार्यालय, पर्यटन भवन, शासकीय विश्रामगृह आवार, गोल्फ क्लब मैदान जवळ नाशिक -422001, दूरध्वनी क्रमांक 0253-2995464 / 2970049 व ddtourism.nashik-mh@gov.in या ई-मेल वर संपर्क साधावा, असे आवाहन  श्रीमती सरदेसाई-राठोड यांनी केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार