सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शेतकऱ्यांनी 15 ऑक्टोबर पर्यंत ई-पीक पाहणीकरिता नोंदणी करावी -जिल्हाधिकारी गंगाथरन डी.

शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ई-पीक पाहणी नोंदणी करणे गरजेचे असून नोंदणी न केल्यामुळे विविध योजनांचा लाभ मिळण्यास अडचण होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-पीक पाहणीसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे

Deepak Chavhan
  • Oct 10 2022 7:25PM
नाशिक  -  शेतकऱ्यांना  पीक पाहणी नोंदणी मोबाईलवरुन करण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे. त्याअनुषंगाने अद्यापही ज्या शेतकऱ्यांनी  पीक नोंदणी केली नाही. त्यांनी आपल्या मोबाईलच्या माध्यमातून 15 ऑक्टोबर, 2022 पर्यंत ई-पीक पाहणीसाठी नोंदणी करावी, असे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी कळविले आहे. 

शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ई-पीक पाहणी नोंदणी करणे गरजेचे असून नोंदणी न केल्यामुळे विविध योजनांचा लाभ मिळण्यास अडचण होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-पीक पाहणीसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी अद्यापही ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांनी आपल्या मोबाईलवरुन प्ले स्टोर मध्ये जाऊन ई पीक पाहणी व्हर्जन-2 ॲप डाऊनलोड करून आपल्या पिकाची नोंदणी करावी. ई-पीक नोंदणी करतांना अडचण आल्यास मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याशी संपर्क करावा. 

ई-पीक पाहणीच्या कामकाजाकरिता मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील व कोतवाल हे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी 7/12 ई- पीक पाहणीची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे. 
 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार