सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

धर्म जिवंत ठेवण्यासाठी धर्माभिमानी पिढी घडवा; डाॅ. सुरेश चव्हाणकेंची हिंदुत्ववादी गर्जना

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या मूल्यसंस्कार मेळाव्यात सुदर्शन न्यूजचे संपादक, प्रख्यात पत्रकार आणि हिंदू स्वाभिमानाचे प्रतीक धर्मयोद्धा डॉ. सुरेश चव्हाणके यांनी जोरदार आणि घणाघाती भाषण केले.

Sudarshan MH
  • May 2 2025 9:23AM
नाशिक: नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर पार पडलेल्या अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या मूल्यसंस्कार मेळाव्यात सुदर्शन न्यूजचे संपादक, प्रख्यात पत्रकार आणि हिंदू स्वाभिमानाचे प्रतीक धर्मयोद्धा डॉ. सुरेश चव्हाणके यांनी जोरदार आणि घणाघाती भाषण करत उपस्थित हजारो सेवेकऱ्यांचे मन जिंकले.
 
मूल्य संस्कार मेळाव्याला महाराष्ट्र गीताने प्रारंभ झाला तर पसायदानाने सांगता झाली. श्री स्वामी प्रतिमा पूजन, दीप प्रज्वलन, प्रकृती बीज पूजन यावेळी करण्यात आले. व्यासपीठावर परमपूज्य गुरुमाऊली श्री मोरे यांच्या समवेत धर्मयोद्धा सुरेश चव्हाणके ,गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे, गुरुमाता सौ मंदाताई मोरे, नगरसेविका वत्सलाताई खैरे, भाग्यश्रीताई ढोमसे तसेच मधुसूदन महाराज, बाळासाहेब खरात महाराज,ज्येष्ठ नेते सुधाकर बडगुजर ,विठ्ठल जपे, सुनील आडके, विशाल मकवाणी, कावेरीताई घुगे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
यावेळी धर्मयोध्दा डॉ. सुरेश चव्हाणके यांनी हिंदू समाजाच्या जाणीवेवर ठाम बोट ठेवत सांगितले, “हिंदू धर्म जाणून घ्या, धर्म जिवंत ठेवण्यासाठी धर्माभिमानी नवी पिढी घडवा.” त्यांच्या या गर्जनेला उपस्थित सेवेकऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात दणदणीत प्रतिसाद दिला.“चंद्र-सूर्य असेपर्यंत श्री स्वामी सेवा मार्ग कार्यरत राहील,” असे उद्गार काढत त्यांनी परमपूज्य गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांचे आणि सेवामार्गाच्या सामाजिक कार्याचे खुलेपणाने कौतुक केले.धर्मयोध्दा डाँ सुरेश चव्हाणके यांनी पुढे सांगितले की, “श्री स्वामी सेवा मार्ग जसे समाजात धर्म आणि संस्कार पेरतो आहे, त्याचप्रमाणे सुदर्शन टीव्हीदेखील देशहित आणि धर्मरक्षणासाठी सदैव तत्पर आहे. दोघांच्या संयुक्त प्रयत्नातून देशात सुसंस्कारित, धर्मनिष्ठ, आणि राष्ट्रभक्त पिढी निर्माण होणार आहे.” कार्यक्रमात विविध सामाजिक आणि आध्यात्मिक उपक्रम राबवले गेले. पण धर्मयोध्द्याचे भाषण हे या मेळाव्याचे खरे शिखरबिंदू ठरले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार