सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोणामुळे शरद पवारांचं पंतप्रधान पद हुकलं?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन ठाण्यामध्ये पार पडले. त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, की "आम्ही प्रथम लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करणार आहोत, नंतर विधानसभेच्या तयारीला लागणार आहोत."

Shruti Turkane
  • Aug 10 2023 11:41AM

ठाणे :

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले, की "आम्ही प्रथम लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करणार आहोत, नंतर विधानसभेच्या तयारीला लागणार आहोत." केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएला लोकसभेची प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. यातील जास्तीत - जास्त जागा महायुतीच्या कशा निवडून येतील? यावर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी ठाण्यात केले.

    तसेच काँग्रेसमुळेचं शरद पवार यांचे पंतप्रधान पद हुकल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे दुजोरा दिला. या प्रकारचे प्रसंग दोन ते तीन वेळा आले होते परंतु त्यांना यश मिळाले नाही, याची आठवण यावेळी अजित पवार यांनी करून दिली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार