सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लॉकडाऊन काळात मत्स्यपालनाचा आधार

नंदुरबार दि. 1 : नवापूर तालुक्यातील खडकी येथील वैष्णवी महिला बचत गटाने आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारतीय संविधान अनुच्छेद 275 (1) अंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना मत्समारीसाठी तरंगते पिंजरे पुरविणे या योजनेतून मत्स्यपालन सुरू

Nandurbar MH
  • Sep 2 2021 10:44AM


नंदुरबार  दि. 1 : नवापूर तालुक्यातील खडकी येथील वैष्णवी महिला बचत गटाने आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारतीय संविधान अनुच्छेद 275 (1) अंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना मत्समारीसाठी तरंगते पिंजरे पुरविणे या योजनेतून मत्स्यपालन सुरू केल्याने  कोरोना संकटाच्या काळात रोजगाराच्या समस्या निर्माण होत असताना गटातील सदस्यांना आधार मिळाला आहे.

वैष्णवी बचत गटातील कामी महिलांचा उदरनिर्वाह शेतमजूरीवर तर काहींचा शेतीवर चालतो. या महिलांना येणाऱ्या मर्यादीत उत्पन्नात कुटुंबाचा खर्च चालविणे कठीण जात असे. दोन वर्षापूर्वी या महिलांना सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या कार्यालयामार्फत पिंजऱ्यातील मत्स्यपालनाविषयी माहिती मिळाली. गावालगत पाझर तलाव असल्याने गटामार्फत मत्स्यपालन करण्याचा निर्णय या महिलांनी घेतला.

बचत गटाला  तरंगते पिंजरे, मत्स्यबोटुकली, तरंगते खाद्य, बिगर यांत्रिकी बोट, यांत्रिकी बोट, रसायने व प्रशिक्षणासाठी 23 लाख 66 हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले. केंद्र शासनाच्या या योजनेसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार कार्यालयामार्फत मंजूरी देण्यात आली.

बचत गटातील आदिवासी महिलांना नंदुरबार, मुंबई आणि पुणे येथे आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणानंतर खडकी तलावात पिंजरे लावण्यात आले. पहिल्या वर्षी पुरेसा अनुभव नसल्याने फारसा लाभ मिळाला नाही. मात्र या महिलांनी जिद्द सोडली नाही. येणाऱ्या अडचणीतून मार्ग काढीत त्यांनी व्यवसाय सुरू ठेवला.

गटातील महिला सदस्यांना कुटुंबातील इतर सदस्यांनीदेखील मदत केली. बोट चालविण्यासाठी मुलांची मदत होते. एकूण सहा पिंजऱ्यांपैकी दोनमध्ये मत्स्य बोटुकली टाकण्यात येते. मासे मोठे झाल्यावर इतर चार पिंजऱ्यात टाकण्यात येतात. वर्षभरात सुमारे 10 टन मासे विक्रीसाठी उपलब्ध होतात. स्थानिक बाजारपेठेत 60 ते 95 रुपये प्रतिकिलो दराने माशांची विक्री करण्यात येते. 

मत्स्य व्यवसायामुळे गटातील प्रत्येक महिलेला साधारण 1 लाख रुपयापर्यंत फायदा होतो असे गटाच्या अध्यक्षा सविता गावीत यांनी संगितले. पूरक व्यवसाय म्हणून मत्स्यपालन महिलांना चांगले उत्पन्न देणारे असल्याचे त्या म्हणाल्या.

मासे विक्रीच्या व्यवहाराची नोंद ठेवण्यात येते. मासे विक्रीनंतर गटातील सदस्यांना त्यांच्या गरजेनुसार मिळालेली रक्कम वाटप करण्यात येते. पिंजऱ्यातील जाळी कुरतडल्यामुळे थोडे नुकसानही होत असल्याचे महिलांनी सांगितले. जाळ्यांची दुरुस्ती करून त्या वापरण्यात येतात. हळूहळू व्यवसायातील बारकावे या महिला शिकत आहेत. त्यांनी स्विकारलेला उत्पन्नाचा हा चाकोरीबाहेरील मार्ग निश्चितच कौतुकास्पद आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार