सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

‘ई-पीक पाहणीत’ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा-महेश पाटील

नंदुरबार दि. 11: पीक विमा आणि पीक पाहणीची दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई

Nandurbar MH
  • Aug 11 2021 6:07PM


नंदुरबार दि. 11: पीक विमा आणि पीक पाहणीची दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे शक्य व्हावे यासाठी जिल्ह्यात 15 ऑगस्ट 2021 पासून ई-पीक पाहणी कार्यक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमात महसूल आणि कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांसह जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन अपर जिल्हाधिकारी महेश पाटील यांनी केले आहे.

 ई-पीक पाहणी बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित  प्रशिक्षणात ते बोलत होते. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी बालाजी क्षीरसागर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे  आदी उपस्थित होते.

श्री.पाटील म्हणाले, ई-पीक पाहणीतून राज्यभरामध्ये एकाच प्रकारच्या पीकासाठी एकच सांकेतांक क्रमांक निश्चित करण्यात येत असल्याने गाव, तालुका, जिल्हा, विभाग निहाय कोणत्या पिकाखाली किती क्षेत्र आहे याची निश्चित आकडेवारी उपलब्ध होणार आहे. कृषी विभागाच्या विशिष्ठ पिकासाठी देय असणाऱ्या योजना जसे ठिबक, तुषार सिंचन योना इत्यादीचे लाभ खातेधारकांना अचूकरित्या देणे सहज शक्य होईल. कोणीही शेतकरी खातेदार पीक पाहणी ॲपबाबतच्या माहितीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

ॲपवर खातेदारांची नोंदणी एकाच वेळी करुन हंगाम निहाय पिकाची माहिती अक्षांस रेखांशासह काढलेल्या पिकाच्या फोटोसह 15 ऑगस्ट 2021 ते 15 सप्टेंबर 2021 या कालावधीत सर्व  खातेदार शेतकऱ्यांनी अपलोड करावयाची आहे.  मोबाईल ॲप मधून प्राप्त झालेल्या पिकाची माहिती अचूकता पडताळून तलाठी यांनी पिकांची माहिती आवश्यकतेनुसार दुरुस्त करुन कायम करावी. शेतकऱ्यांना या प्रणालीचे महत्व पटवून द्यावे. तालुका स्तरावर प्रणलीबाबत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

रविंद्र मंचरे आणि जयेश राऊळ यांनी प्रणालीबाबत प्रशिक्षण दिले. बैठकीत सादरीकरणाद्वारे ई-पीक प्रणालीची माहिती देण्यात आली. प्रशिक्षणाला तहसलिदार,  कृषि अधिकारी, प्रत्येक तालुक्यातील चार मास्टर ट्रेनर्स उपस्थित होते.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार