सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार: स्थानिक गुन्हे शाखेने केला 87 हजाराचा गांजा जप्त

नंदुरबार: स्थानिक गुन्हे शाखेने 87 हजाराचा गांजा जप्त करीत गुन्हेगारांना मोठा झटका दिला. तळोदा तालुक्यातील रामपूर येथे ही कारवाई करण्यात आली.

Nandurbar MH
  • Jul 3 2021 6:02PM

नंदुरबार: स्थानिक गुन्हे शाखेने 87 हजाराचा गांजा जप्त करीत गुन्हेगारांना मोठा झटका दिला. तळोदा तालुक्यातील रामपूर येथे ही कारवाई करण्यात आली.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रविंद्र कळमकर यांना दिनांक 2 जुलै 2021 रोजी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली. तळोदा तालुक्यात रामपुर गावाचे जवळ सतोना गाव शिवारात रेसा नदया पाडवी याने त्याचे ऊसाच्या शेतात बेकायदेशीररीत्या गांजाच्या झाडांची लागवड केली असल्याची अधिक माहिती मिळाली. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी लगेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक तयार करुन आदेशीत केले. तळोदा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक अविनाश केदार यांच्या पथकासमवेत जाऊन सतोना गावात खात्री केली. शेतात सर्वत्र 6 ते 7 फुट उंचीचे ऊसाचे पिक व एका शेतात एक इसम संशयास्पद आढळला. त्याने त्याचे नांव रेसा नदन्या पाडवी रा. रामपुर पो. मोदलपाड ता. तळोदा जि. नंदुरबार असे सांगितले.  शेत त्याच्या मालकीचे असल्याचेही सांगितले. शेतात आतील बाजुस ठिक ठिकाणी 5 ते 6 फुट उंचीचे हिरवट रंगाचे गांजा सदृश्य झाडांचं लागवड केल्याचे दिसून आले, म्हणून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संपूर्ण दिड एकर शेती पिंजून काढल असता तेथे 87 हजार 825 रुपये किंमतीची एकुण 16 गांजाची झाडे मिळून आल्याने संशयीत रेसा नदन्या पाडवी यास त्याच्या शेतात मिळुन आलेले गांजाची झाडे गुन्ह्याच्या पुढील तपासकामी योग्य ती सर्व कायदेशीर प्रक्रिया करून ताब्या घेण्यात आले. त्याचेविरुद्ध गुंगीकारक औषध द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अन्वये तळोदा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार दिपक गोरे, महेंद्र नगराळे, रविंद्र पाडवी, पोलीस नाईक सुनिल पाडवी, बापु बागुल, विशाल नागरे मोहन ढमढेरे, तुषार पाटील, रमेश साळुंके, अविनाश चव्हाण, पोलीस अमंलदार विजय ढिवरे, दिनेश लाडकर, संजय रामोळे चेतन चौधरी, तळोदा पोलीस ठाण्याचे युवराज चव्हाण, कांतीलाल वळवी यांचा पथकात समावेश होता या सर्वांचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार