सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मराठा आरक्षण रद्द झाल्याने क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठानतर्फे निषेध आंदोेलन

नंदुरबार- सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे.

Nandurbar MH
  • May 7 2021 10:18AM





नंदुरबार- सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. या निर्णयामुळे समस्त मराठा समाजासाठी हा अन्यायकारक निर्णय असून या निर्णयाच्या विरोधात नंदुरबार येथील क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठानच्या वतीने आज दि.6 मे 2021 रोजी नंदुरबार शहरातील जुनी नगरपालिकेजवळ निषेध आंदोलन करण्यात आले. केंद्र व राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे मराठा समाजाच्या पदरी आरक्षण रद्दची निराशा आली आहे. मराठा समाजाचे आरक्षण रद्द होण्यास केंद्र व राज्य सरकारच जबाबदार असल्याची प्रतिक्रिया क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रविण मराठे यांनी यावेळी व्यक्त केली.

मराठा समाजाला प्रगती व विकासाच्या दृष्टीने भारतीय संविधानानुसार  आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी समस्त मराठा समाजाने राज्यभर आंदोलन केले होते. या आंदोलनावेळी काही मराठा समाजातील युवकांनी बलिदानही दिले आहे. मराठा समाजाने आरक्षणासाठी स्वंयमाने न्यायालयीन लढाई दिली. परंतू केंद्र सरकार व राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे सर्वोच्च न्यायालयात पुरावे सादर न केल्याने मराठा आरक्षण न्यायालयात टिकू शकलेे नाही. यामुळे सर्वोेच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. या निर्णयाने मराठा समाजाच्या पदरी संघर्षानंतर पुन्हा आरक्षणाच्या बाबतीत निराशाच आली आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ नंदुरबार येथील जुनी नगरपालिका परिसरात आज दि.6 मे 2021 रोजी नंदुरबार येथील क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठानच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी न्यायासाठी लढा देेऊच, समाजातील युवकांचे बलिदान वाया जावू देणार नाही, असे म्हणत एक मराठा लाख मराठा आणि जय शिवाजी, जय भवानीचा जयघोषणा दिल्या. याप्रसंगी क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रविण महेश मराठे, पप्पू मराठे, निलेश जगताप, यशराज मराठे उपस्थित होते.

--------------------------------------------
मा. संपादक साो.,                           दि.06/05/2021
महोदय,
  सदरची बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिध्दी देवून सहकार्य करावे, ही विनंती.

   प्रविण महेश मराठे
   संस्थापक अध्यक्ष
क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठान, नंदुरबार

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार